Tag Archive | moral stories in marathi

आपण जे उपदेश करता त्याचा सराव करा

   

नीती    :  सत्य

उपनीती  :  शब्द, आचार आणि कर्म यांची एकता

                    

संत स्वत: ज्याचा  सराव करतात तेच आपल्याला शिकवतात. म्हणूनच त्यांच्या सल्ल्यात आम्हाला चांगले बनवण्याची शक्ती आहे.

थोर गुरु रामकृष्ण परमहंसांच्या शिष्यांपैकी एक गरीब स्त्री होती. एके दिवशी ती आपल्या मुलासह त्यांच्याकडे आली आणि म्हणाली, “गुरुदेव, माझ्या मुलाला दररोज मिठाई खाण्याची इच्छा होते. ही सवय त्याचे दात खराब करीत आहे आणि दररोज ते विकत घेणेही मला परवडत नाही. माझा सल्ला, चेतावणी आणि मारहाण करणे सर्व व्यर्थ गेले. कृपया त्याला काही सल्ला द्या आणि आशीर्वाद द्या जेणेकरून तो ही वाईट सवय थांबवेल. ”

श्री रामकृष्णने त्या मुलाकडे पाहिले, परंतु त्याच्याशी बोलण्याऐवजी त्या महिलेला दोन आठवड्यांनंतर परत आणण्यास सांगितले.

दोन आठवड्यांनंतर त्या बाईने मुलाला त्यांच्याकडे आणले. दोघे बसले असता, श्री रामकृष्णनी प्रेमळपणाने मुलाकडे पाहत म्हणाले, “माझ्या प्रिय मुला, तू दररोज गोड खाण्या साठी तुझ्या आईला त्रास देतोस हे खरं आहे का?” मुलाने डोके हलवले आणि म्हणाला, “होय सर” आणि तो शांत झाला. “ तू हुशार मुलगा आहेस. तुला  माहित आहे की मिठाई आपले दात खराब करीत आहे. तुझी आईसुद्धा तुझ्या  काळजीत आहे. जर ती दररोज मिठाईंसाठी पैसे खर्च करत राहिली तर ती तुझ्या साठी नवीन पुस्तके आणि चांगले कपडे कसे खरेदी करू शकेल? तू चूक करत आहेस  असे तुला वाटत नाही? ”

श्री रामकृष्णाच्या शब्दांनी मुलाच्या मनाला स्पर्श केला. त्याने श्री रामकृष्णांकडे पाहिले आणि “हो सर” म्हणाला आणि तो पुन्हा शांत झाला. “मग, आजपासून तू मिठाई मागणे बंद करशील?”  श्री रामकृष्णांनी आवाहन करणाऱ्या स्वरात विचारले. मुलगा या वेळी हसला आणि म्हणाला, “होय महाराज,  मी आजपासून माझ्या आईला मिठाईसाठी त्रास देणार नाही आणि रोज ते खाणेही बंद करीन.”

श्री रामकृष्ण,  मुलाच्या उत्तरावर खूष झाले, त्यानी प्रेमाने त्याला जवळ केले आणि म्हणाले: “मुला, तू एक छान मुलगा आहेस. तुझ्यासाठी काय चांगले आहे आणि काय वाईट आहे हे तुला समजते. तू नक्की एक मोठा माणूस होशील.”  मुलाने नमस्कार केल्यावर श्री रामकृष्णांनी त्याला आशीर्वाद दिला आणि इतर भक्तांकडे वळले.

मुलगा बागेत बाहेर गेल्यानंतर त्याच्या कृतज्ञ आईने श्री रामकृष्णांना विचारले, “गुरुदेव, तुम्ही आम्हाला सल्ला देण्या आधी काही आठवडे थांबण्यास का सांगितले?” श्री रामकृष्ण हसले आणि म्हणाले, “हे पाहा, दोन आठवड्यांपूर्वी जेव्हा तुम्ही आलात, तेव्हा मलासुद्धा भक्तांनी आणलेल्या मिठाई खाण्याची सवय लागली होती. मी स्वत: जवळजवळ दररोज करत असलेले काही करू नये म्हणून मी आपल्या मुलाला कसे विचारू शकत होतो?  म्हणून, त्या दिवसापासून मी मिठाई खाणे बंद केले. याने तुमच्या मुलास सल्ला देण्यास पुरेसे सामर्थ्य आणि शक्ती मला मिळाली. जेव्हा आपण ज्याचा सराव करतो त्याचाच उपदेश देतो तेव्हाच आमचे शब्द प्रामाणिकपणाने भरलेले असतात आणि ऐकणार्यांना पटतात. ”

खोलीतील सर्व भक्तांना असे वाटले की त्यांनीही श्री रामकृष्णाकडून मोठा धडा घेतला आहे.

शिकवण :

ही कथा दर्शविते की, चांगले कसे व्हावे किंवा आध्यात्मिक सराव कसे करावे याबद्दल इतरांना सांगण्या पूर्वी  सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे तो स्वत: सराव करणे. एखाद्याला खात्री असणे आवश्यक आहे आणि त्यांनी इतरांना उपदेश करण्यापूर्वी योग्य मूल्यांचा अभ्यास केला पाहिजे.

स्वतः लादलेल्या मर्यादा

मूल्य: योग्य दृष्टीकोन, सत्य

उप मूल्य: आत्मविश्वास,

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, बम्बळ मधमाशीचे शरीर खूप बोजड असून पंख खूपच लहान असतात. हवेच्या दाबामुळे मधमाशी उडू शकत नाही. परंतु तिला त्याची माहिती नसल्याने ती उडत रहाते.

जेव्हा तुम्हाला तुमच्या मर्यादा माहित नसतात तेंव्हा तुम्ही बाहेर जाऊन स्वत:ला चकित करता. मर्यादाबाबत तरतूद होती कां याचे आश्चर्य वाटते.

प्रत्येकावर असलेल्या मर्यादा या स्वत: लादलेल्या असतात. शिक्षणा मुळे तुम्ही स्वतःवर मर्यादा घालून घेऊ नका.

शिकवण

आपल्या मध्ये असलेल्या क्षमतेबाबत आपण सकारात्मक असले पाहिजे. आपण सकारात्मक दृष्टीकोनातून अडचणीविना पुढे जात राहून काम पूर्णत्वास नेण्याच्या आत्मविश्वासाने यशस्वीरित्या बाहेर पडले पाहिजे

भज गोविन्दम – श्लोक ४ (4)

अस्तित्वाची अनिश्चितता समजून घ्या

न्लीनिदलगत जलमतितरलम

तद्वाज्जीवीत मतीशयचपलम

विद्धि व्याध्याभिमानागारस्तम

लोकम शोकहातम च स्मस्तम

भज गोविन्दम भज गोविन्दम

                                    

कमळाच्या पाकळीवर विसावलेल्या दव बिंदू चे अस्तित्व अनिश्चित असते; तसेच, आयुष्य देखील अस्थीर असते. जग व्याधी, अहंकार आणि वैषम्याने ग्रासलेले आहे.

गोविंद भजा, गोविंद भजा!!

 

श्लोक ४ वर आधारित कथा

जीवन क्षणिक असते

एक अमेरिकन पर्यटक होता जो एकेकाळी एका सुप्रसिद्ध विद्वान माणसाला भेटण्याहेतू मिस्रमधल्या काइरो शहरात गेला होता. जेंव्हा तो त्या विद्वानाच्या घरी गेला होता, त्याने थोड्याच फर्निचरसह एक सभ्य घर पाहिले. त्या खोलीत एक पलंग, एक टेबल आणि एक बाक होते.

                                            

पर्यटक आश्चर्यचकीत झाला आणि विद्वानाला विचारू लागला, “तुमचे फर्निचर कुठे?” विद्वानाने उत्तर देण्या ऐवजी पर्यटकाला विचारले, “आणि तुमचे कुठे?” “माझे?” पर्यटकाने आश्चर्याने विचारले. “मी एक पर्यटक आहे आणि मी इथे केवळ भेटीसाठी आलो आहे; फक्त जाता जाता.”

विद्वानाने तेंव्हा म्हटले, “पृथ्वीवरील जीवन देखील क्षणिक आहे…. तरी, काही जण असेच जगतात की जणू ते इथे कायमच राहणार आहेत, आनंदी राहण्याचे विसरून  जातात.” “मी देखील जात आहे.”

सार

आदि शंकर समजावतात की आयुष्य कमळावरच्या दवबिंदू समान क्षणभंगुर आहे. कमळ चिखलात उमलते परंतु सभोवतालच्या वातावरणामुळे प्रभावित होत नाही.कमळाच्या पानावर पाण्याचे थेंब विसावतात पण ते अनासक्त असतात. त्याचप्रकारे, आपले क्षणभंगुर जीवन व्याधी, वैषम्य, गर्व, अहंकाराने ग्रासलेले असते आणि आपण कमळाकडून शिकले पाहिजे कसे हे अल्पकालीन जीवन आसक्ती विना जगायचे आणि जे शाश्वत आहे ते शोधायचे. आपल्याला या जीवनशैलीचे अंतराळ जानूने घेतले पाहिजे आणि अर्थपूर्ण जीवन जगले पाहिजे. केवळ प्रभूचे नाव उच्चारूनच आपण खरे प्रेम, आनंद आणि स्थायीपणा शोधू शकतो.   

विद्यार्थ्यांसाठी

प्रेम विकसित करा द्वेष नाकारा

 नीती   योग्य आचरण

उपनीती : क्षमाशीलता                                    

बालवाडीच्या शिक्षकाने आपल्या वर्गात एक खेळ खेळू देण्याचा निर्णय घेतला होता. शिक्षकांनी प्रत्येक मुलाला पुढील दिवसासाठी काही बटाटे प्लास्टिक पिशवीतून  आणण्यासाठी सांगितले. मग मुलांना प्रत्येक बटाटाला द्वेष करणार्या व्यक्तीच्या नावाने गुप्तपणे नामांकित करण्यास सांगितले. तर, त्या प्लास्टिकच्या पिशवीत मुलानी/मुलीनी टाकलेल्या बटाट्यांची संख्या तो/ती किती लोकांवर द्वेष करतो/करते  त्या संख्येवर अवलंबून असेल.खेळ खेळण्यास उत्सुक आणि कुतूहलाने, प्रत्येक मुलाने तो/ती ज्या लोकांचा द्वेष करतात, त्या व्यक्तीच्या नावाने काही बटाटे आणले. काही मुलांनी २ बटाटे; काहीने ३ तर काहीने ५ बटाटे आणले. शिक्षकांनी मग मुलांना त्यांच्या बटाट्यांच्या पिशव्या त्यांच्या बरोबर १ आठवड्याभर, ते जिथेजिथे जातात (टोईलेटला देखील), तिथेतिथे न्यायला सांगितले. खेळला सुरुवात झाली.दिवस निघून गेल्यावर, मुलांनी सळलेल्या बटाट्यांमुळे होणार्या अप्रिय गंध आणि दुर्गंधीबद्दल तक्रार करण्यास सुरवात केली. शिवाय, ज्यामुलांचे बटाटे जास्ती होते त्यांना जड पिशव्या उचलाव्या लागायच्या. आठवडा हळूहळू सरत होता, खेळा सम्पुष्टात आला आणि मुलांनी आरामदायी श्वास घेतला. त्यांच्या जिज्ञासला सीमाच नव्हती, ह्या आगळ्यावेगळ्या बटाट्यांच्या खेळाचे निष्कर्ष जाणून घेण्यासाठी, उत्सुकतेने त्यांनी शिक्षकाच्या अवतीभवती घोळका घातला. शिक्षकाने त्यांना विचारले, “मुलानो, एक आठवडाभर तुमच्या बरोबर बटाटे उचलून नेताना कसे वाटले?” मुलांनी त्यांच्या निराशा व्यक्त केल्या  आणि गेल्या आठवड्यापासून त्यांच्याबरोबर दुर्ग्न्धीत बटाट्यांची पिशवी घेऊन त्यांना आलेल्या समस्येची तक्रार करण्यास सुरुवात केली.     

                                

शिक्षकाने त्यांच्या दुःख आणि तक्रारी धैर्याने ऐकल्या; मग तिने खेळामागे लपलेल्या अर्थ हळूहळू ठळकपणे सांगितले.शिक्षकाने म्हटले, “जेंव्हा तुमच्या मनात कुणाच्याही विषयी द्वेष घेऊन तुम्ही वावरता, तेंव्हा असेच होते. द्वेषाचा दुर्गंध तुमच्या मनाला मलीन करते आणि हे तुम्ही तुमच्या बरोबर घेऊन फिराल. जर तुम्ही एक आठवडाभर ह्या दुर्ग्न्धला सहन करू शकला नाहींत, तुम्ही विचार करू शकता का, कीजीवन तुमच्या मनातला  हा द्वेषाचा दुर्गंध तुम्ही आयुष्यभर कसे सहन करु शकाल???”

 शिकवण:

आपल्या हृदयातील कोणासाठीही असलेले द्वेष दूर फेकून द्या, जेणेकरून आपल्याला आयुष्यभर पापांचे ओझे वाहून घ्यावे लागणार नाही. इतरांना क्षमा करणे ही सर्वात चांगली मनोवृत्ती आहे! खरे प्रेम परिपूर्ण व्यक्तीवर प्रेम करणे  नव्हे तर अपरिपूर्ण व्यक्तीवर प्रेम करणे होय.असे मानले जाते की मुल ही देवाची अवतार आहेत. मुले निरागस आणि निसर्गाने आनंदी असतात. किमान 5/6 वर्षापर्यंत आम्ही बघतो की जेव्हा जेव्हा मुले पडतात किंवा त्यांच्या मित्रांशी लढतात तेव्हा त्यांना दुखापत होते; तेंव्हा तेंव्हा ते लवकरच ते विसरतात आणि काही मिनिटांत किंवा काही तासांत त्यांच्या आनंदी स्वभावात येतात. ते ही दुखणे पुढच्या काही वर्षापर्यंत नेत नाहींत. ते सूड किंवा पीळ बाळगत नाहींत. जसजसे आपण वाढत जाणे प्रारंभ करतो, आपली बुद्धी अधिक विकसित होत जाते आणि आपण बाहेरील जगातून शिकू लागतो  आणि लवकरच प्रतिक्रिया देउ लागतो किंवा वेगळ्या पद्धतीने वागू लागतो. आपण अहंकाराची भावना, आसक्ती विकसित करतो आणि जसे हे विकसित करीत असताना आपण आपल्या खऱ्या आत्म्यापासून दूर राहतो जे नेहमी आनंदी आणि शांत होते.हे सत्य आहे की जगात असणे आणि वाढण्याची प्रक्रिया करीत असताना आपण सर्वांनी ही नकारात्मक गुण विकसित केली आहेत. या गुणांमध्ये सुधारणा करण्याचा आणि सकारात्मकतेकडे जाण्याचा एकमात्र मार्ग म्हणजे हे ​​देखील उत्तीर्ण होईल.‘ ‘आम्ही अर्भका पासून शिशु, ते तरूण आणि प्रौढापर्यंत वाढत असताना आपण बर्याच गोष्टी विसरून गेलोत. तिथून पुढे गेलोत. ते सर्व क्षणिक  होते. आकस का ठेवावे? भूतकाळाचा लवाजमा का उचलावा?सर्व काही बदलत असते. काहीही कायम नसते. जर ही मूल्ये तारुण्यापासूनच मनावर ठसवले असते तर;  मुल विचारांत स्पष्टता विकसित करतील आणि धैर्याने जीवनातील आव्हानांना सामोरे जातील.

http://saibalsanskaar.wordpress.com

आत्मविश्वास स्तर

 

नीती : प्रेम                

उपनीती : विश्वास, श्रद्धा

        तो लांब फ्लाइटवर होता. समस्येची पहिली चेतावणी त्यावेळी आली जेव्हा विमानावरील चिन्हे सुरु झाली: “आपल्या आसनबंद बांधा.”नंतर, थोड्या वेळानंतर शांत आवाजात म्हणाले, “आम्ही या वेळी शीतपेयांसाठी सेवा करणार नाही कारण आम्हाला थोडेफार गोंधळ आहे. कृपया आपले आसनबट्टा बांधले आहे याची खात्री करुन घ्या.”
विमानाच्या आजुबाजुला बघितले तर हे स्पष्ट झाले की, अनेक प्रवाशी चिंताग्रस्त  झाले होते. नंतर, निवेदकाचा आवाज म्हणाला, “आम्ही दिलगीर आहोत, आम्ही या वेळी जेवणाचे काम करण्यास असमर्थ आहोत. गोंधळ अजूनही आपल्या पुढे आहे.”आणि मग वादळ आल. इंजीनीच्या आवाजापेक्षा जोरात ढगांचा गडगडाट ऐकू येत होते. अंधार्युक्त आकाशात विजेचा उजेड लखलखत होता आणि क्षणार्धात विमान शांत महासागरावर कॉर्क सारखे टॉस होत असल्यासारखे वाटत होते. एका क्षणी विमान हवेच्या भयानक प्रवाहाने उंच उचलले गेले; पुढच्याक्षणी ते पटकन खाली येवूलागले  जणू ते क्राश होत की काय.   

 

turbulant plane

 

              त्या माणसाने कबूल केले की त्याने आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या अस्वस्थता आणि भीती सामायिक केल्या. ते म्हणाले, “मी विमानात आजूबाजूला पाहत होतो, मला वाटू लागले की जवळजवळ सर्व प्रवाशी अस्वस्थ आणि चिंताग्रस्त झाले होते आणि काही जण प्रार्थना करत होते.भविष्य अंधुक दिसत होते आणि  अनेक जणांना ह्या वादळातून बाहेर पडण्याची शंका वाटत होती. आणि मग, अचानक मला एक मुलगी दिसली जिला वादळाशी काहीही देणघेण नव्हत. ती तिच्या आसनावर पाय दुमडून बसली होती आणि एक पुस्तक वाचत होती.तिच्या लहान जगाच्या आत सर्व काही शांत आणि सुव्यवस्थित होते. काहीवेळा ती  डोळे बंद करायची, मग ती पुन्हा वाचायची; मग ती तिचे पाय सरळ करायची, पण काळजी आणि भीतिचा तिला लवलेशही नव्हता. जेंव्हा ते विमान त्या भयानक वादळात हेलकावे घेत होते, जेंव्हा ते असे तसे झोकांडी घ्यायचे, ते उंच जाऊन भयावह तीव्रतेने खाली यायचे, जेव्हा सर्व प्रौढ लोक अर्धे मृत्युपर्यंत घाबरले होते, तेव्हा हे आश्चर्यकारक मुल पूर्णपणे स्थिरचित्त आणि निर्भय झाले होते.”त्या माणसाला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. त्यामुळे, जेंव्हा विमान अखेरेस आपल्या मुक्कामाला पोचले आणि सर्व प्रवाशी खाली उतरण्याची धडपड करीत होते, तो ज्या मुलीला बरेच वेळ निहालीत होता, तिच्याशी बोलण्यासाठी तो तिथेच लुडबुडू लागला.विमानाच्या वादळाविषयी आणि वर्तनाबद्दल त्याने टिप्पणी केली, त्याने तिला विचारले की ती का घाबरली नाही? त्या  गोड मुलीने उत्तर दिले,“साहेब, माझे बाबा विमानचालक आहेत आणि हे मला घरी घेऊन चाललेत.” 

शिकवण :

जेव्हा आपण स्वत:ची खात्री बाळगतो, तेव्हा आपला आत्मविश्वास स्तर स्थिर असतो आणि आपण शांतपणे यशस्वीरित्या आपली कामे करू शकतो. विश्वास आणि श्रद्धा आपल्याला दूर पर्यंत साथ देतात. ह्या कथेतील मुलीला पूर्ण विश्वास होता की तिचे वडील तिला सुरक्षितपणे नेतील, त्याप्रमाणे आपले मालक, देव सुद्धा आपल्यावर प्रेम करतात आणि जर आपण त्याच्यात श्रद्धा व निष्ठा ठेवली, आपण देखील आत्मविश्वास विकसित करू आणि हेच आपल्याला ह्या आयुष्याच्या वाटेवर नेईल.  

Nagaratna Bhatt

http://saibalsanskaar.wordpress.com

श्रीमंत माणूस मनःशांतीच्या शोधात

नीती   : शांती

उपनीती : कृतज्ञता, देवाशी कृतज्ञता

एक अति श्रीमंत माणूस, जीवनातील सर्व सुख उपभोगून, पैशांनी विकत घेवू शकणारे सर्व वस्तूंचा उपभोग घेवूनही समाधानी नव्हता. त्याला अजून कुठल्यातरी  अधीप्रमाणित वस्तूची भूक होती. तो सर्व साधू व संताशी चौकशी करायचा, आणि त्याने त्यांनी सांगितलेली सगळीच कर्मकांड, पूजा अर्चा, प्रार्थना केलीत, पण कशाचाही उपयोग झाला नाहीं.

शेवटी हा माणूस दुसर्या संताकडे  गेला आणि आपल्या दुखाच्या बद्दल सांगून सतत व वारंवार त्याचा छळ करू लागला – “वेळ व्यतीत होत चालला आहे, आणि तुम्ही कसले संत आहात? तुम्हाला मला योग्य मार्ग दाखवता येत नाहीं. आणि मला त्यासाठी  अर्पण करण्यास चोवीस तास आहेत; मला पैसे कमविण्यासाठी किंवा कोणत्याही गोष्टीसाठी काम करण्याची गरज नाही, मला मुले नाहींत, आणि मी इतका पैसा कमवला आहे की तो किमान दहा जीवनासाठी पुरेसे आहे.” संताने त्याला थोडेसे वेडे असलेले सूफी मास्टरकडे पाठविले, ज्यांच्याकडे अनेक ऋषी आपल्या शिष्यांना त्यांच्यापासून मुक्त करण्याचा प्रयत्न करीत पाठवत असत. पण ते वेडे दिसणारे सुफी संताकडे भव्य शहाणपणा होता.                     

श्रीमंत माणसाने एक मोठा बॅग घेवून त्यात हिरे, माणके,  नीलम आणि नीलमणी भरले; आणि तो झाडाखाली बसलेल्या त्या सुफीकडे गेला. त्याने सुफिला त्याची संपूर्ण कथा सांगितली….. तो किती दुःखी आहे, त्याच्याकडे  सर्वकाही जगाला परवडण्यासारखे होते. “मी तुम्हाला पुरावा देण्यासाठी ही लाखांची संपूर्ण बॅग आणली आहे. मला केवळ मनः शांती हवीय.” सुफी म्हणाला, “मी ते तुला देईन. सज्ज हो.”श्रीमंत माणसांनी विचार केला, “हा विचित्र माणूस वाटतोय. मी इतक्या संतांकडे गेलोय – कोणीही इतक्या सहजतेने, इतके शीघ्र देण्याच वचन दिले नाहीं. सर्वांनी म्हटले, ‘हे कर्मकांड कर, ही उपासना कर, ही प्रार्थना म्हण, हे ध्यान कर. स्वतः कष्ट कर.’ हा एकमेवच आहे…..कदाचित, ते सर्वजण खरेच सांगतात की हा वेडा आहे. हा म्हणतोय, ‘सज्ज हो. वेळ दवडू नकोस!’

 घुटमळत तो म्हणाला, “ठीक आहे, मी तयार आहे.” जरी तो मनः शांती मिळवण्याकरीता आला होता, तो खूप घाबरलेला होता. आणि जेंव्हा त्या माणसाने म्हटले की तो तयार आहे, त्या सुफी मास्तराने ती पिशवी ओढून घेतली आणि तो पळाला.

 ते गाव छोटे होते ज्यात छोट्या गल्ल्या होत्या ज्याची त्या सुफीला चांगलीच माहिती होती. तो श्रीमंत माणूस कधीच पाळलेला नव्हता. तो त्या सुफीच्या मागे ओरडत पळू लागला, “माझी फसवणूक झालीय! हा माणूस संत नव्हे. हा वेडाही नाहीं, हा कावेबाज आहे.” पण त्याला त्या सुफीला पकडता आले नाहीं कारण तो इतका वेगाने जात होता आणि गावात इतक्या वळण घेत होता की त्याला पकडणे अशक्य  होते.  तो वृध्द माणूस जाडा होता – धापा टाकीत, घाम गाळीत, तो रडत होता – आणि सर्व जण त्याला पाहून हसत होते. सगळे त्याला पाहून का हसत होते हे त्याला कळत नव्हते, आणि कोणीही त्याची मदत करत नव्हते. पण गावातल्या लोकांना ठाऊक होते की तो सुफी वेडा नव्हता त्याच्या उलट तो कावेबाज होता. तो त्याच्या स्वत:च्या पद्धतीने काम करत होता. 

आखेर, तो श्रीमंत माणूस त्याच वृक्षा जवळ पोचला. तो सुफी त्याच्या तो आधीच तिथे पोचला होता; तो ती पिशवी घेऊन तिथे बसला होता. आणि, श्रीमंत माणूस ओरडत होता, शिवी घालीत होता. सुफी म्हणाला, “हा सर्व मूर्खपणा थांबव! ही बॅग घेऊन जा.”

 त्याने लगेच बॅग ताब्यात घेतली, आणि सुफीने विचारले, “कसे वाटतेय?” तो म्हणाला, “मला खूप शांती वाटतेय.” सुफी म्हणाला, “तेच तर मी तुला सांगत होतो. तू तयार असशील तर मी तुला लगेच शांती देऊ शकतो. तुला ते मिळाले का?” तो म्हणाला, “मला ते मिळाले.” 

“पुन्हा कोणालाही त्याच्या विषयी विचारू नकोस! तू तुझी सर्व संपत्ती गृहीत धरली आहेस. मी तुला ती  गमाविण्याची एक संधी दिली आणि अचानक तू तेच झाला जो तू आहेस – भिकारी. आणि हेच मौल्यवान दगड तुझ्यासाठी मौल्यवान  ठरले आहेत.” पण तसेच घडते. 

शिकवण:

महालात राहणारे त्याच महालाला गृहीत धरतात; श्रीमंत लोक गरिबांच दुख समजून घेत नाहींत. ज्या लोकांकडे मास्तर आहेत त्यांनी त्यालाच गृहीत धरले – की काही उरले नाहीं; तुम्ही केवळ प्रश्न विचारायचा आणि तुमचे मास्तर आहेत तुम्हाला उत्तर द्यायला. तुमच्या आयुष्यात मिळालेल्या वस्तूची आणि भेटवस्तूंची कदर करायला व जोपासायला शिका.          

Nagaratna Bhatt

http://saibalsanskaar.wordpress.com

दोर

नीती    : श्रद्धा 

उपनीती  : क्षमा

एक गिर्यारोहक, ज्याला उंच उंच डोंगरावर चढायच व इतरांना प्रभावित करायचा छंद होता, त्याची गोष्ट सांगितली गेली आहे. बर्याच तयारी आणि प्रशिक्षणानंतर त्याला वाटले की तो जगातील कुठल्याही डोंगराळ भागाची हाताळणी करू शकेल, कुठलीही अडचण नसताना.

एक गिर्यारोहणाच्या दरम्यान, पाच अन्य पुरुषांसह,  त्याने ठरविले की जेंव्हा इतर झोपलेले असतील तेंव्हा तो  अंतिम शिखर एकटा गाठेल आणि गौरवाचा दावा करेल. रात्री त्यांच्या गटातल्या इतर जण आले, त्याने गिर्यारोहणाचे कपडे धारण केले आणि शिखराच्या दिशेने जावू लागला. त्याने चढण सुरु करताना, पौर्णिमाच्या चंद्राच्या उजेडात त्याला सर्वकाही दिसत होत, ह्याचा त्याला आनंद झाला. 

जरी रात्रीच्या वेळी एकट्याने गिर्यारोहण करणे मूर्खाचे असले, त्याने सुरक्षितेसाठी दोरीचा आणि पायोनाचा वापर ही केला. रात्रीची वेळ असून देखील, पौर्णिमेचा पुरेपूर लाभ घेत, तो डोंगर भराभरा चढू लागला. शिखराच्या जवळ जात असताना त्याचा आत्मविश्वास वाढू लागला, पण दुर्दैवाने, पर्वताच्या अवतिभवती दाट ढग जमायला लागले, आणि हिवाळ्यातील वादळ विकसित झाल्याने दृश्यमानता झपाटय़ाने कमी होत चालली होती. फक्त काही मिनिटांत दृश्यमानता जवळजवळ शून्यावर पोहचली, दाट ढगाने  आणि धुक्याने त्याला वेढले. आता परत फिरायला खूप उशीर झाला होता, त्वरेने वादळ उडाण्याची आशा करीत, तो डोंगर चढत गेला.                     

आता पूर्ण अंधार झाला, आणि पुढे सरसावत असताना तो एका कुजलेल्या खडकाला आदळला आणि पर्वताच्या रांगेच्या बाजूने आणि उंच कडेच्या काठावर घसरला. ह्यातली चांगली बाब म्हणजे त्याने सुरक्षतेसाठी वापरलेली वस्तू मुळे तो पडून देखील जिवंत राहिला; अवतिभवती काही दिसत नसले तरी त्याला स्वतःला हवेत दोरीच्या सहाय्याने लटकलेले समजले.  पण वाईट गोष्ट ही होती के, त्याने गिर्यारोहणाच्या वेळी, त्याच्या पाठीवर असलेल्या बॅकपॅकवरून जाकेट सैल बांधलेला तो पडताना कुठेतरी हरवला. हळू हळू वादळाचा गार वारा त्याच्या पातळ आतल्या जाकेट मधून  हाडापर्यंत गारठा देवू लागला. स्वतःला वर्तुळात फिरवून पाहिलं, आणि कशाचाही आधार नसल्याच जाणवल, हताशपणे तो ओरडू लागला, “हे देवा, कृपाकरून माझी मदत कर.”

अचानक, वरून त्याला एक आवाज ऐकू आला, “दोर काप!” “काय?!” हवेतून ऐकण्याचा प्रयत्न करीत असताना, त्याला पुनः एक आवाज ऐकू आला, “दोर काप!” 

गिर्यारोहक दोरीवर लटकत होता, सुरक्षते साठी कशाचाही आधार शोधत असताना, वार्याच्या आवाजाच्या व्यतिरिक्त, गूढ शांतता होती. त्याच्या खऱ्या परिस्थितीला पाहण्यास असमर्थतावरून, इतरांप्रमाणे त्याने ही दोरीला धरून लटकणे, हाच पर्याय निवडला. 

दुसर्यादिवशी, इतर गिर्यारोहकांना तो मरून गोठवलेला सापडला, अजून दोरीवर लटकलेला – केवळ एका खडकाच्या आट फीट उंचीवर. जर त्या गिर्यारोहकाने दोरी कापली असती, तो एखाद्या सुरक्षित जागी पडला असता, जिथे त्याने आजूबाजूला असलेल्या सुकलेल्या गवत जाळून शेखोठी पेटवली असती आणि स्वतःला वाचवल असत. 

शिकवण : ह्या दुर्दैवी गोष्टी वरून आपण एक शिकू शकतो – देवावर श्रध्दा. आपण एका दोरीवर विश्वास ठेवायचा  की आपल्या आयुष्यातल्या अनेक ज्ञानाबाहेर किंवा नियंत्रणाच्या बाहेर असलेल्या वस्तुंसाठी देवावर विश्वास ठेवायचा? 

लक्षात ठेवूया   कारण मी परमेश्वर आहे, तुझा देव आहे  जो तुझा उजवा हात धरतो आहे, आणि  मी तुला सांगतो आहे, घाबरू नकोस; मी तुझी मदत करेन.”  इसाइअह ४१:१३   

Nagaratna Bhatt

http://saibalsanskaar.wordpress.com