Archive | December 2020

स्वतः लादलेल्या मर्यादा

मूल्य: योग्य दृष्टीकोन, सत्य

उप मूल्य: आत्मविश्वास,

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, बम्बळ मधमाशीचे शरीर खूप बोजड असून पंख खूपच लहान असतात. हवेच्या दाबामुळे मधमाशी उडू शकत नाही. परंतु तिला त्याची माहिती नसल्याने ती उडत रहाते.

जेव्हा तुम्हाला तुमच्या मर्यादा माहित नसतात तेंव्हा तुम्ही बाहेर जाऊन स्वत:ला चकित करता. मर्यादाबाबत तरतूद होती कां याचे आश्चर्य वाटते.

प्रत्येकावर असलेल्या मर्यादा या स्वत: लादलेल्या असतात. शिक्षणा मुळे तुम्ही स्वतःवर मर्यादा घालून घेऊ नका.

शिकवण

आपल्या मध्ये असलेल्या क्षमतेबाबत आपण सकारात्मक असले पाहिजे. आपण सकारात्मक दृष्टीकोनातून अडचणीविना पुढे जात राहून काम पूर्णत्वास नेण्याच्या आत्मविश्वासाने यशस्वीरित्या बाहेर पडले पाहिजे

आपल्याला कशावर जास्त प्रेम आहे ? माणसांवर कि वस्तू वर ?

मूल्य  –  शांतता व सबुरी

उप मूल्य घाई व रागावर त्यंयम ठेवावा 

एक माणूस आपल्या नवीन गाडीलाला पौलिश करत असतांना त्याच्या चार वर्षाच्या मुलीने  एक दगड उचलून गाडीच्या बाजूला खरवडले. रागीट माणसाने रागाने  मुलीच्या हातावर इतक्यांदा मारले की त्याला आपण सुडाने वागतोय याची जाणीव झाली नाहीं . नंतर त्याची जाणीव होऊन त्यांने तिला इस्पितळात नेले . पण त्याला फार उशीर झाला होता कारण अस्थिभंगा मुळे मुलीची बोटे निकामी झाली होती. ›

जेव्हा मुलींने वडिलांच्या डोळ्यात दुःख पाहिले, तेव्हां तिने विचारले, ” बाबा, माझी बोटे  केव्हां वाढतील ? ”  माणूस दुःखा मुळे अबोल झाला. तो परत आपल्या गाडीकडे गेला व अनेकदा गाडीला लाथा मारल्या. स्वतःच्या ह्या वागण्यानें दुःखी होऊन गाडी समोर बसून त्याने गाडीवरील ओरखाड्यांकडे पाहिले. मुलीने लिहिले होते, ” बाबा, मी तुमच्यावर प्रेम करते.”

शिकवण :

राग व प्रेम यांना बंधन नसते. हे लक्षात ठेवले पाहिजे कि वस्तूंचा उपयोग करावा व लोकांवर प्रेम करावे. पण आजच्या जगात दुर्दैवानें लोकांचा उपयोग केला जाऊन वस्तूंवर प्रेम केले जाते. आपण जर सबुरी धरली व रागावर नियंत्रण केले तर सर्वांवर प्रेम निर्माण केले जाईल.