Archive | August 2021

चित्त-चोर (हृदय चोरणारा) कृष्ण: भगवान कृष्ण आणि चोर

नीती    : भक्ती 

उपनीती  : श्रद्धा 

एक ब्राह्मण (पुजारी), ज्याचा व्यवसाय परमेश्वराचे गौरव गान करणे होते, एकदा एका आश्रयदात्याच्या घरी श्रीमद्भागवत पठण करत होता. पठण चालू असलेल्या घरात एक चोर घुसला आणि त्याने स्वतःला खोल कोपऱ्यात लपवले.

नाईलाजाने, त्याला श्रीमद भागवत (भगवान श्रीकृष्णाच्या सुंदर कथा आणि चमत्कार) ऐकावे लागले. गायक आता बाळ कृष्णाने घातलेल्या दागिन्यांचे वर्णन करत होता. त्यांनी माता यशोदाने, गायींसोबत बाहेर पाठवण्यापूर्वी, बाळ कृष्णाना  सजवलेल्या विविध दागिन्यांचे वर्णन केले. चोर उत्साहित झाला आणि त्याने विचार केला की त्याने त्या मुलाला भेटावे आणि क्षुल्लक चोरीसह दररोज संघर्ष करण्याऐवजी एकाच झटक्याने सर्व दागिने लुटावेत. श्रीमद भागवताचा संपूर्ण अध्याय पठण होईपर्यंत तो थांबला आणि मग तो तिथून गेला. त्या चोराला त्या मुलाचे ठिकाण जाणून घ्यायची खूप उत्सुकता होती. म्हणून, तो ब्राह्मणाच्या मागे गेला आणि त्यांची वाट अडवली .  ब्राह्मण घाबरला आणि त्याला भीती वाटली की दक्षिणा म्हणून मिळालेली थोडीशी रक्कमही गमवावी लागते की काय आणि त्याने चोराला सांगितले, “माझ्याकडे काही नाही”.

चोराने उत्तर दिले की ब्राह्मणाकडे असलेले त्याला कशाचीही इच्छा नाहीं पण तो मुलगा, जो उत्तम दागिने घालून गुर चरण्या साठी नेत होता, त्याच्या बद्दल जाणून घ्यायचं होत. चोराने त्यांना त्या ठिकाणी घेऊन जाण्याची विनंती केली जिथे तो मुलगा त्या गायींना चरायला नेत होता. ब्राह्मण आता चक्रावले होते. ते म्हणाले, “यमुना नदीच्या काठावर, वृंदावन शहरात, हिरव्या कुरणात, दररोज सकाळी दोन मुले येतात. एक बासरी सह ढगांसारखा सावळा, आणि दुसरा, गोरा,  पांढरा रेशम घातलेला. मी वर्णन केल्याप्रमाणे जो सावळा असेल त्याच्याकडे दागिने असतील. 

चोराने ब्राह्मणावर विश्वास ठेवला आणि लगेचच वृंदावनाला निघाला. त्याने सुंदर ठिकाण शोधले, एका झाडावर चढला आणि मुलांच्या येण्याची वाट पाहू लागला. सूर्य उगवला. सकाळच्या वाऱ्यासह बासरीचा मंद मधुर आवाज येऊ लागला. मग मन मोहून टाकणारे संगीत जवळून ऐकू आले आणि चोराने दोन मुलांना येताना पाहिले. तो झाडावरून खाली उतरला आणि त्यांच्या जवळ गेला. ज्या क्षणी त्याने लहान कृष्णाचे सर्वात सुंदर रूप पाहिले,  तो स्वतःला विसरला,  हात जोडून आनंदाश्रू  ढाळू लागले. त्याच्या हृदयातून येत असलेले अश्रू होते आणि ते रोमांचक होते. त्याला आश्चर्य वाटत होते की कोणत्या आईने या तेजस्वी मुलांना नदीच्या काठावर दागिन्यांनी सुशोभित करून, प्राविण्याने रेखीव सझवून पाठवले आहे. त्याला  दिव्यत्व पासून नजर हटवणे शक्यच नव्हते. परिवर्तन सुरू झाले.

तो मुलांच्या जवळ गेला….. ओरडत, “थांब,” म्हणत  कृष्णाचा हात धरला. ज्या क्षणी त्याने भगवान श्रीकृष्णाला स्पर्श केला,  त्या क्षणी त्याची सर्व पूर्व कर्मे कापसाचा गोळा आगीत जाळल्यासारखी नष्ट झाली…. आणि पूर्ण नम्रतेने त्याने प्रेमाने विचारले, “कोण आहेस तू?”

कृष्णाने त्याच्याकडे निरागसपणे पाहिले आणि म्हणाला, “तुझ्या अवताराने मी घाबरलो आहे. कृपया माझे हात सोड…. “. आता, पश्चातापाने चोर कृष्णाला म्हणाला, “हे माझे वाईट मन आहे जे माझ्या चेहऱ्यावर दिसून येते. जर तुम्ही घाबरलात तर मी निघून जाईन. कृपा करून मला इथून जायला सांगू नका”

नटखट (दैवी खोडकरपणाने) कृष्णाने चोराला त्याच्या तेथे येण्याच्या उद्देशाची आठवण करून दिली आणि “ हे दागिने घे”.  अशी खिल्ली उडवली. गोंधळून, चोराने उत्तर दिले,  “जर तू तुझे सर्व दागिने मला भेट दिले तर तुझी आई तुला फटकारणार नाही का?”  कृष्ण हसून म्हणाला, “याची काळजी करू नका. माझ्याकडे ते भरपूर आहेत. मी तुमच्यापेक्षा मोठा चोर आहे. पण तुमच्या आणि माझ्यामध्ये फरक आहे – मी कितीही चोरी केली तरी मालक तक्रार करत नाहीत. मला प्रेमाने “चित्त चोर” म्हटले जाते. जरी तुम्हाला याची जाणीव नसेल, तरी तुमच्याकडे पूर्वीचे अलंकार आहेत, “चित्त (हृदय)”. मी ते आता चोरून घेईन आणि तेच माझ्याबरोबर नेईन.”  असे म्हणत दोन्ही मुले गायब झाली. 

त्याला आश्चर्य वाटले, चोराला त्याच्या खांद्यावर दागिन्यांनी भरलेली पिशवी सापडली. त्याने ते ब्राह्मणाच्या घरी आणले आणि सर्व वृत्तांत त्याला सांगितले. ब्राह्मण आता घाबरला आणि त्याने चोराला आत नेऊन पिशवी उघडली. तो  अचंबित झाला, त्याने वर्णन केलेले  भागवतामधले  कृष्णाने परिधान केलेले सर्व दागिने चोराच्या पिशवीत पाहिले.

आनंदाश्रू ढाळत, ब्राह्मणाने चोराला त्या ठिकाणी त्यांना नेण्यास विनंती केली, जिथे त्याने त्या सावळ्या मुलाला पाहिले होते. चोराने उपकृत केले आणि दोघेही त्याच ठिकाणी थांबले जिथे चोराने आदल्या दिवशी मुलाला पाहिले होते. अचानक चोर उद्गारला, “हे बघ, ते आलेत!” तथापि,  ब्राह्मणाला कोणी दिसत नव्हते. निराश होऊन तो म्हणाला, “प्रभु, जेव्हा तुम्ही चोराला दर्शन देण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मला का नाही?”

भगवान श्रीकृष्णाने विपुल करुणेने उत्तर दिले, “तुम्ही श्रीमद्भागवत फक्त दुसरी कथा म्हणून वाचत आहात, तर चोराने तुम्ही माझ्याबद्दल जे सांगितले त्यावर विश्वास ठेवला. मी फक्त त्यांच्यासाठी प्रकट होतो ज्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मला शरण येतात.”

परमेश्वराला पाहणाऱ्या चोराचा गौरव…. चला आपले चित्तही चित्त-चोरावर सोडूया!

शिकवण :

कोणत्याही श्रद्धेशिवाय केवळ शास्त्र शिकणे किंवा वाचणे काही उपयोगाचे नाही. श्रद्धा पर्वत हलवू शकते.