Archive | July 2020

श्लोक २१ -भज गोविन्दम-पुन: पुन: जन्म मरणाचे कालचक्र

श्लोक २१ 

पुन: पुन: जन्म मरणाचे कालचक्र 

पुनरपि जननं पुनरपि मरणं

पुनरपि जननीजठरे शयनम् ।

इह संसारे बहुदुस्तारे

कृपयाऽपारे पाहि मुरारे ॥ २१ ll

भज गोविन्दम भज गोविन्दम 

पुन्हा पुन्हा जन्म आणि मृत्यू, पुन्हा आईच्या गर्भाशयात येणे ! – असा संसार ओलांडणे अवघड आहे… हे मुरारी (मुरा चा वध करणारा) तुझ्या असीम दयाळूपणाने मला ह्यातून वाचव.

गोविंदाला स्मरा गोविंदाला स्मरा !!

 

श्लोक २१ वर आधारित कथा 

 

                                                            कर्मा

 

एक माणूस त्याच्या जीवनात अनन्य त्रासातून जात होता. तो त्याच्या परिवाराचा, ज्यात त्याचे वयस्कर पालक, बहिणी, त्याची पत्नी आणि मुल, एकुलता एक पोशिंदा होता. एक दिवस तो खूप आजारी पडला आणि

जवळजवळ एक आठवडा कामावर जाऊ शकला नाही, परिणामी त्या माणसाला नोकरीवरून काढून टाकले. त्याच्या कुटुंबाचे पोषण कसे करावे हे कळत नव्हते, तो खूप निराश झाला. त्याने त्याच्या अवतीभवती लोकांना आनंदात आणि आरामशीर जीवन जगत असलेले पाहिले आणि  त्याला आश्चर्य वाटले की तो एकटाच का ग्रस्त आहे? तो त्याच्या प्राक्तन वर उदास बसलेला असताना  गावात एक महान संताच्या त्या गावात आगमनाची आणि ते तिथेच महिनाभर राहतील, घोषणा झाली. ते संत तिथे गावात प्रार्थना आयोजित करणार आणि अध्यात्मिक भाषण ही देणार होते. ह्या कालावधीत, एका श्रीमंत व्यापारीने 

सर्व गावातील लोकांना संपूर्ण महिना मोफत जेवण देण्याचे आयोजित केले आणि सर्वांना निमंत्रण होते.

मनुष्याने ही घोषणा ऐकताच, कमीतकमी महिनाभरासाठी आपल्या घराच्या अन्नाचा प्रश्न सुटेल आणि त्यादरम्यान तो दुसर्‍या नोकरीचा शोध घेऊ शकणार एवढेच नाहीं तर गुरुजींना ऐकण्याची संधी ही मिळेल, असे त्याला वाटले.

दुसऱ्या सकाळी गावात गुरुजींचे आगमन झाले, त्या माणसाने गुरुजींचे हार्दिक स्वागत केले आणि त्यांना सांगितले की जोपर्यंत ते त्यांच्या गावात राहतील  तोपर्यंत त्याला दररोज त्यांची सेवा करायला आवडेल. गुरुजी या माणसावर खूष होते आणि त्यांनी आपल्या रोजच्या प्रार्थना इत्यादींची काळजी त्याला घ्यायला सांगितले. हा माणूस प्रामाणिकपणे, अत्यंत उत्साहाने आणि प्रेम व भक्तीने, दररोज गुरुजींची सेवा करू लागला. प्रत्येक संध्याकाळी तो गुरुजींचे भाषण ऐकत असत. तथापि मानसिकदृष्ट्या तो त्याच्या भविष्याबद्दल व्याकुळ झाला होता आणि इतके दुर्दैवी कारणे त्याच्यावर का आली. गुरुजी एक अनुभवी मास्टर होते आणि एक संध्याकाळी त्यांनी कर्मावर प्रवचन दिले. त्यांनी कर्माचे खालीलप्रमाणे सुंदर वर्णन केले.

कर्मांचे ४ प्रकार आहेत : 

  1. प्रारब्ध कर्म – परिपक्व कर्म

कल्पना करा की एका झाडावर सफरचंद चे फळ आहे. ते परिपक्व आहे. एकत्र ते वेळेवर झाडावरून तोडावे नाहींतर ते स्वत: झाडापासून वेगळे होऊन खाली जमीनेवर पडेल. ते कायमस्वरूपी झाडावर नाहीं राहू शकत. त्याचप्रमाणे, प्रारब्ध एक परिपक्व कर्म आहे. केंव्हातरी, तुम्ही एका वृक्षाची लागवड केली आणि त्याचे फळ आज परिपक्व झाले. तुमची इच्छा किंवा प्राधान्य काही असो, त्याने स्वतःचा मार्ग घेतला आहे, अगदी ज्याप्रमाणे धनुष्य सोडलेला बाण. एकदा का तुम्ही कुठले ही कर्म केले, त्याची नोंद विश्वात होते, एके दिवशी ते फळ धरते. ह्यातून सुटका नाहीं. सध्या तुमच्या जीवनात जे काही घडते, सध्या हा शब्द लक्षात घ्या, तुमचे ह्याचावर काहीच नियंत्रण नसते, हेच तुमचे प्रारब्ध आहे. तुम्ही गेल्या जन्मी किंवा आधीच्या जन्मी जे काही पेरले लागते, त्याचे परिणाम चांगले किंवा वाईट, हे भोगावेच लागतात. तुम्ही जर विचार करत असाल की तुम्हाला एवढे का भोगावे लागते तर ते तुमच्या मागील कर्मांचे परिणाम आहेत. एखाद्याला मागील कर्मांचे परिणाम भोगावेच लागतात. पण ह्याचा अर्थ असा नाहीं की तो त्याचे भविष्य बदलू शकत नाहीं. प्रारब्ध म्हणजे जे परिपक्व आहे. कुठले ही कर्म भविष्यात परिपक्व होत असेल, ते प्रारब्ध नाहीं, हे दुसऱ्या श्रेणीत येते :

  1. संचित, संग्रहित कर्म

हे तुमच्या कर्मांचा संचय आहे. वृक्षावरील सर्व फळे एकच दिवशी पिकत नाहींत, पुढच्या हंगामात त्याच्यावर परत फळे येतील, आणि पुढच्या आणि त्या पुढेही. ह्याच कारणांस्तव प्रचंड लोकांच्या आयुष्यावर हे चक्रीय आहे. का? तुम्ही जर सफरचंदांचे वृक्ष लावले आहेत, हंगामात तुम्हाला भरपूर फळे प्राप्त होतील आणि, जर तुम्ही कितीही आकर्षित असलेले वन्य बेरींची लागवड केली असेल, काटेरी झुडुपे त्यांचे संरक्षण करत असले तरी, त्यांच्या हंगामात त्यांचा खूप भरभराटीत वाढ होईल. म्हणूनच संकट क्वचितच एकट्याने येतात, ते नेहमी झुन्डात येतात, तसाच चांगला काळ. संचित कर्मांत एक अद्वितीय गोष्ट आहे, ते बदलू शकते! आपण आपल्या सफरचंद किंवा बेनबेरीच्या स्त्रोताकडे जाऊ शकता तर आपण त्यांचे पालनपोषण करणे निवडू शकता, किंवा त्यांचा पूर्णपणे नाश करू शकता. स्त्रोताकडे जाने महत्वाचे आहे.

  1. आगामी, आगामी होणारे कर्म

कल्पना करा की तुम्ही सफरचंदाच्या बागेत गेलात. तुम्ही एक कर्म केले, तुम्ही निवडही केली, सक्ती किंवा स्वैच्छिक, पर्वा न करता. ह्या कर्मावर आधारित, तुम्ही नक्कीच अन्य असे कर्म करणार जसे की सफरचंदाच्या वृक्षांची पाहणी करणे, त्यांचा सुगंध अनुभवणे, आणि त्याचे परिपक्व होण्याची वाट पाहणे, हे एक निश्चित कर्म आहे. या कर्माचे महत्त्व कमी किंवा अधिक लेखले जाऊ शकत नाही. आपण आजची निवड तुमच्या भविष्यावर थेट परिणाम करतो, आपण वर्तमानात काय करता ते पुढील काळात उलगडत. आगामी कर्म हे अनिवार्य आहेत, जरी असला तरी, तुम्हाला पर्याय नाहींत. तुम्ही जर बागेत प्रवेश केला असेल, तुम्हाला बाहेर पडायची कार्रवाई करावीच लागेल, लवकर नाहीं तर उशिरा. तथापि, जर तुम्ही तुमचे संचित कर्मांचे संचय बदलले किंवा वर्तमान कर्मात फेर बदल करण्याचा उचित उपाय केला, हे आपोआप बदलेल.

  1. वर्तमान, उपस्थित, कर्म

ह्याला क्रीयामानही म्हणतात, कारवाई करण्यायोग्य, वर्तमान कर्म, जे घडत आहे. अजून एक ठराविक मुदत आहे, ज्याला कदाचित पुरुषार्थ म्हणतात, मेहनत, कर्म. आपण असे समजूया की तुम्हाला सफरचंद नकोत. तुम्ही वृक्ष कापू शकतात, तुम्ही ते उपटून टाकू शकतात. तुम्हाला व्यवस्थापित करण्याचा मार्ग शोधावा लागेल किंवा विल्हेवाट लावावी लागेल, सडलेले सफरचंद, ओला कचरा आणि इतर सर्व गोष्टींचा विल्हेवाट लावावी लागेल, पण तरी ही एक तीव्र प्रयत्न. त्यानंतर,  वर्षोनुवर्षे कोणतेही फळ तुमची वाट पाहणार नाहीं. तुम्ही फक्त गहू पेरणे आणि काही महिन्यानंतर ते कापणे, हे निवडू शकता, नियमितपणे तुमच्या कार्मिक शेतीची स्वच्छता करणे.

एक समर्पक प्रश्न हा आहे की तुम्ही नवीन कर्मे करतात किंवा मागील कर्मांचा परिणाम भोगत आहात. उत्तर सोपे आहे, जेंव्हा तुम्ही निवडलेले कार्य करतात, तुम्ही एक नवीन कर्म घडवतात आणि जेंव्हा तुमच्यावर काही करण्याची सक्ती होते, तुम्ही केवळ तुमच्या मागील कार्मिक कर्जाची परतफेड करतात. माजी कर्मांचे  परिणाम आपल्यासाठी चांगले किंवा वाईट असो भोगावेच लागतील, त्यानंतर आपल्या कर्माचे संचय  किंवा संचित कर्म दुसर्‍या शब्दात व्यवस्थापित करून, त्यांच्यावर निगा राखले जाऊ शकतात. आपल्याला कोणतेही फळ नको असल्यास चांगले किंवा वाईट, तुम्ही सर्व कृत्ये नि:स्वार्थपणे करून परमेश्वराला अर्पण करा. जेव्हा एखाद्याने त्यांच्या मागील सर्व क्रियांचे फळ संपवले असेल तेंव्हाच हे होऊ शकेल.

आपण काल निवडलेले कर्म, ऐच्छिक किंवा अन्यथा, आपल्याला आहात त्या  ठिकाणी आणून पोचवले आहे आणि आज आपण निवडलेले कर्मे तुमचे भविष्य ठरवेल. म्हणूनच, आपण लक्षपूर्वक कृत्ये करणे हे सर्वोपरि महत्वाचे आहे, आपले सध्याचे विचार, भविष्यात उपलब्ध निवडी थेट ठरवणार, आपल्या सध्याच्या क्रियांचे व्युत्पन्न, आपले भविष्य, चांगले, वास्तविकतेने, आपले जीवन यावर अवलंबून असते.

अशा प्रकारे गुरुजींनी त्यांचे भाषण संपविले. या व्यक्तीला त्याच्या प्रश्नांचे उत्तर मिळाल्यावर खूप आनंद झाला आणि त्यांनी चांगल्या आचार आणि विचारांचा सराव सुरु केला. लवकरच गुरुजींना गाव सोडून जाण्याची वेळ आली. ज्या माणसाने इतक्या विश्वासाने त्यांची सेवा केली त्याच्यावर ते खूप खुश होते. त्यांनी त्याला खूप आशीर्वाद दिले. ज्या श्रीमंत व्यापार्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यांनी ही ह्या माणसाचे प्रामाणिकपणा आणि समर्पण पाहिले होते आणि त्यानी त्या माणसाला त्याच्या कंपनीत चांगली नोकरी दिली आणि तो माणूस त्याच्या सर्व संकटांतून मुक्त झाला.

म्हणूनच त्या माणसाला हे समजले की ते त्याचे वाईट कर्म होते ज्यामुळे त्याला त्रास सहन करावा लागला आणि त्याचे चांगले कर्म होते ज्याने त्याला गुरुजींना भेटण्याची आणि त्यांची सेवा करण्याची संधी दिली. त्याने शिकवलेले धडे मनापासून घेतले आणि त्याच्या कृतींवर अर्थपूर्ण लक्ष ठेऊन जीवन जगण्यास सुरवात केली.

सार 

एखादा माणूस त्याची वासना किंवा प्रवृत्ती संपवण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घेतो. आपल्या मार्ग आणि ध्येयाच्या अज्ञानामुळे, आपल्यातील बहिर्मुखीपणा आपल्याला वस्तूंसह स्वतःला जोडण्यास भाग पाडते, ज्याचे आपल्या मनानी निर्माण केलेले   सौंदर्य आणि लावण्य आहे ! अहंकार आणि अहंकारिक इच्छा न वापरता हे संपवणे, हीच एक युक्ती आहे.

कधीकधी, आपण गुलामगिरीतच सुखदायी असतो. आपल्याला ज्ञान न मिळाल्यास आपण अडकतो. जर आपल्याला ते मिळाले, पण त्यातून बाहेर पडण्याचे सामर्थ्य नसले, तरीही आपण पुन्हा अडकतो.

म्हणूनच, आपण जर सर्वोच्च कृपा प्राप्त करण्यासाठी मनोभावे कळकळीने विनंती  केली, तर आपल्याला नक्कीच प्राप्त होईल.

विद्यार्थयांसाठी

नीती    : योग्य आचरण

उपनिती  : सकारात्मक विचार 

                                                                     

कर्म म्हणजे काय ?

 

बुद्ध, त्यांच्या शिष्यान सोबत बसले होते. एकाने त्यांना विचारले, “कर्म म्हणजे काय?” 

बुद्ध म्हणाले, “तुम्हाला एक गोष्ट सांगतो…”

एक राजा त्याच्या राज्यात हत्ती वरून भ्रमण करत होता. अचानक बाजारातल्या एका दुकानाच्या समोर ते थांबले आणि त्यांनी त्यांच्या मंत्रीला  म्हटले, “का कोण जाणे, पण मला ह्या दुकानदाराला फाशी द्यावीशी वाटते.” मंत्री दचकले. पण राजाला काही विचारण्याआधीच, राजा पुढे चालले गेले.

दुसऱ्या दिवशी, मंत्री गावकर्याच्या वेशात त्या दुकानदाराला भेटण्यास त्याच्या दुकानात गेले. त्यांनी सहजच त्याला त्याचा धंदा कसा चाललाय ते विचारले. दुकानदार, एक चंदनाचा व्यापारी, खिन्नपणे म्हणाला की त्याच्याकडे ग्राहक येत नाहींत. लोक त्याच्या दुकानात येतात, चंदनाचा सुवास घेतात आणि निघून जातात. ते चंदनाची प्रशंसाही करतात पण क्वचितच विकत घेतात. तो एकच उमेद बाळगत होता की रजनी लवकरच मृत्यू पावावे. त्याच्या नंतर त्याच्या अंतिम संस्कारासाठी  चंदनाची खूप मोठी मागणी येईल. कारण तो एकटाच चंदनाचा व्यापारी होता, त्याला खात्री होती की राजा चा मृत्यू म्हणजे घबाड होईल.

आता त्या मंत्र्याला कळले की राजा त्या दुकानाच्या समोर का थांबले होते आणि त्या दुकानदाराला मारण्याची इच्छा व्यक्त केली होती. कदाचित, त्या दुकानदाराचे नकारात्मक विचारांचे कंपन राजाला अलगद शिवून गेले होते, ज्यांनी, परिणामी, तत्सम नकारात्मक विचार त्यांच्यात निर्माण केले.

मंत्री थोर होते, त्यांनी ह्या विषयावर घन विचार केले. त्याला आपण कोण आहोत हे व्यक्त न करता किंवा आदल्या दिवशी काय घडले होते, हे न सांगता, त्यांनी थोडे चंदन घरेडी करण्याची इच्छा व्यक्त केली. दुकानदाराला आनंद झाला. त्यांनी चंदन एका कागदात गुंडाळले आणि मंत्र्याला दिले.

मंत्री महालात गेले आणि थेट राजा बसलेले त्या दरबारात गेले आणि म्हणाले की चंदनाच्या व्यापार्याने त्यांच्यासाठी भेट दिली आहे. राजा आश्चर्यचकीत झाला. त्यांनी जेंव्हा गठ्ठा उघडला, सोनेरी रंगाच्या आकर्षक चंदन पाहून आणि सुगंधाने हर्षित झाले.  प्रसन्न होऊन, त्यांनी त्या चंदनाच्या व्यापार्यासाठी काही सुवर्ण मुद्रा पाठवल्या. राजाला त्या दुकानदारा विषयी आपल्या मनात आलेल्या वाईट विचारांच दुख झाले.

राजा कडून आलेले सुवर्ण मुद्रा स्वीकारताना, दुकानदाराला आश्चर्य वाटले. तो राजाचा गुणगान करू लागला, कसे त्या सुवर्ण मुद्रांनी त्याला, दारिद्र्यातून वाचवले ह्याचा जाहीररीत्या घोषणा करू लागला. काही काळा नंतर, राजा विषयी त्याचे वाईट विचारांचा त्याला आठवण झाली आणि स्वतःच्या ध्येयासाठी आलेले नकारात्मक विचारांचा त्याला खंत वाटू लागला.

जर आपल्याकडे दुसर्‍या व्यक्तीसाठी, चांगला आणि दयाळू विचार असेल तर तो सकारात्मक विचार आपल्याकडे अनुकूल मार्गाने परत येईल. परंतु आपण जर वाईट विचारा बाळगले तर, हे विचार प्रतिफळ म्हणून आपल्याकडे परत येतीलच.

कर्म काय आहे?” बुद्धनी विचारले

अनेकांनी उत्तर दिले, “आपले शब्द, आपले आचार, आपले विचार, आपले कार्य…..”

बुद्द्नी डोक हलवत म्हटले, “तुमचे विचार तुमचे कर्म आहेत!”

 

शिकवण 

आम्ही जे देऊ ते आम्हाला मिळेल. प्रत्येक गोष्ट प्रतिक्रिया आणि प्रतिकृती बद्दल आहे. चांगले विचार, कृती आणि क्रिया समान परत मिळतील.

पुन्हा विद्यार्थ्यांसाठी; जेव्हा आपल्याला असे तत्वज्ञान साध्या कथांद्वारे आणि अनुभवांद्वारे दार्शनिक संकल्पना द्वारे समजावले जातात; आपण कसे विचार करावे, कसे वागावे हे निवडण्यासाठी, आपणास आपल्या कृतीची जाणीव व्हावी  आणि आपण त्यानुसार कार्य करावे, निदर्शन होते. या मूल्ये आणि शिकवणी लहानपणापासूनच आत्मसात केल्यावर, आपल्या शिक्षणादरम्यान, कामात आणि आयुष्यात, आपल्याला जेव्हा सर्वात जास्त आवश्यकता असेल तेव्हा. अशा लोकांना संतुलित जीवन मिळेल आणि भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही गोष्टींचा आनंद स्पष्ट समजून घेऊन जगता येईल.

http://saibalsanskaar.wordpress.com

श्लोक २० -भज गोविंदम

 

अध्यात्मिक अभ्यासाद्वारे आपली आंतरिक सामर्थ्य ओळखून धैर्याने शेवटाचा सामना करा

भगवद्गीता किञ्चिदधीता

गङ्गाजललवकणिका पीता ।

सकृदपि येन मुरारिसमर्चा

क्रियते तस्य यमेन न चर्चा ॥ २०॥

भज गोविंदम भज गोविंदम !! 

ज्याने भगवद्गीतेचा अगदी थोडासा अभ्यास केला आहे, ज्याने कमीतकमी गंगेचे एक थेंब पाणी प्यायले आहे, ज्याने एकदा तरी मुरारीची पूजा केली असेल, त्याला यम, मृत्यूचा स्वामीशी कोणतीही चर्चा (भांडण) करण्याची आवश्यकता नाही

गोविंदाला भजा गोविंदाला भजा!!

श्लोक २०वर आधारित गोष्ट

एका चोराचे परिवर्तन

एकदा एक चोर चोरी करण्यासाठी वस्तू शोधत होता, परंतु त्याला फारसे काही सापडले नाही. नैराशाने तो एका मंदिरात गेला जेथे अर्चक (पुजारी) अनेकांना धार्मिक भाषण देत होते. चोराने व्यावसायिक लोकांची पैसे चोर्ण्याले ठरवले, पण एका वेगळ्या चेहरा असलेला नवीन माणसाची उपस्तिथी पाहून, काही वेळ त्याने भाषण ऐकण्याचे ठरवले. पुजारी सत्यावर बोलत होते, त्या चोराला हे भाषण इतके वाईट नसल्याचे वाटले. तो सत्याच्या भावनेत पूर्णपणे गुंतला होता. कार्यक्रम संपल्या नंतर सगळे आप-आपल्या घरी परतले शिवाय चोर जो बाहेर जायला तैयार नव्हता.

चोराला चिंता वाटू लागली की पुजारीना वाटेल की तो चोर देवळात काही तरी चुकीचे करेल. भीती कमी करण्यासाठी त्या चोराने पुजारीला विचारले, “माझे इथे काही काम नाहीं पण तुम्ही सत्याच्या म्ह्त्वावर इतके गहन भाषण दिले जे मला खूप आवडले. तथापि माझ्या मनाला अझूनही  पटत नाहीं.” चोराच्या मनात सत्यते विषयी अनेक प्रश्न आणि वितर्क होते. त्याला वाटत होते की एक चोर खोट बोलण्या पासून कसे वाचू शकतो.

सत्य बोलूनही तो आपला व्यवसाय करू शकतो असा सखोल सल्ला याजकांनी त्याला दिला. सत्याचे पालन करून ही तो, कुठे ही असला किंवा काहीही चोरले असले तरीही तो निर्धोक आणि सुरक्षित राहू शकतो. याजकानी चोराला चोरी करताना देखील यशस्वी होण्याचे आत्मविश्वास दिला. चोराने व्यावहारिक जीवनात, पुजारीच्या सल्ल्याचे पालता स्वत: ला फक्त तथ्य सांगण्यासाठी वचनबद्ध केले.

न करण्याचा दृढ निश्चय केला आणि त्यांनी त्या दिवसापासून सर्व बाबतीत सत्य आणि प्रामाणिकपणे दिलेल्या आज्ञेचे पालन करण्याचे वचन दिले. त्याने त्या क्षणापासून सर्वत्र सत्यवचन देत असताना की तो पुन्हा त्याच्या आयुष्यात कधीच खोटे बोलणार नाहीं, त्याच वेळी, राजा सध्या वेशात, राजधानीतले  वातावरण जाणून घेण्यासाठी तिथे फिरत होते. योगायोगाने, चोराला एक माणूस फिरताना भेटला. फिरत असलेल्या माणसानी चोराला ओळख विचारली. चोराला सदैव सत्य बोलण्याचे वचन आठवले, जरी कठीण असले तरीही, त्याने चोर असल्याचे सांगितले. त्या गृहस्थाने आनंदाने व उत्साहाने उत्तर दिले की तोही चोर होता. एकमेकांना मिठी मारून हे दोघे मित्र बनले.

नवीन चोरांने सुचवले की काही अतिशय मौल्यवान वस्तू चोरावीत आणि ते कोठे सापडतील हे त्याला ठाऊक आहे. त्याने त्याला अशा गुप्त मार्गाने नेले की दोघे शाही राज महालाच्या समोर येऊन पोहोचले आणि नवीन चोराने त्याला शाही तिजोरी पर्यंत नेले आणि त्याला तिजोरी उघडण्यास सांगितले. तिजोरी उघडल्यावर, त्यांना त्यात अत्यंत मौल्यवान पाच हीरे सापडले. चोर मित्राने केवळ चार चोरण्याचे सुचवले – दोघांना दोन दोन कारण एक हीरा अर्ध्यात तोडल्याने त्याला किमत नसते. तर त्यांनी चार घेतले आणि एक हीरा तिजोरीतच सोडला. दोघे लूट वाटून घेऊन आप-आपल्या मार्गी निघाले.

दुसऱ्या दिवशी शाही महालाच्या कार्यालये उघडल्यावर त्यांना शाही तिजोरी फोडल्याचे जाणवले. शाही कोषाध्यक्षाने निरीक्षण केले, त्याला ४ हीरे गहाळ झाल्याचे जाणवले. त्याला ह्या संधीचा फायदा घ्यायचा होता, म्हणून उरलेला हीरा त्याने आपल्या खिशात टाकला आणि राजांना सूचित केले की त्यातले ५ मौल्यवान  हीरे शाही तिजोरीतून चोरीला गेलेत. राजाने सुरक्षा रक्षकांना चोराला अटक करून महालात आणण्याचे आदेश दिले. महालात चोराला आणून राजाच्या समक्ष प्रस्तुत केले.

 

राजाने काळजीपूर्वक त्याच्या डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत त्याचे निरीक्षण केले आणि म्हणाला, “तर मग तू चोर आहेस. आपण कशाची चोरी केलीत?”

चोर म्हणाला, “मी खोट बोलू शकत नाहीं, म्हणून तुम्हाला सांगतो की मी माझ्या मित्राबरोबर शाही तिजोरीतील हीरे चोरलेत.”

“तू किती हीरे चोरलेस?” राजांनी विचारले. “आम्ही चार चोरले. दोघांना दोन दोन. शेवटच्याला तोडता येत नसल्या कारणाने, आम्ही एक तिजोरीतच सोडला.” राजाने खाजांचीला विचारले, “किती हीरे गहाळ झालेत?” “सर्व पाच, महाराज.” काय आहे याची जाणीव झाल्यावर राजाने ताबडतोब कोषाध्यक्षांना कामावरून काढून टाकले आणि चोराला नवीन कोषाध्यक्ष म्हणून नेमले कारण नवीन कोशाध्याक्षाची नेहमी सत्य बोलण्याची वचनबद्धता होती.

चोराला एकदाका सत्य बोलण्याची सवई विकसित केली; त्याला त्याचे बक्षीस मिळाले आणि लवकरच  त्याने त्याचे सर्व वाईट सवई सोडून दिल्या. चांगल्या सवईचा सराव आणि दृढनिश्चय आपल्याला वाईट सवई काढून टाकण्यास मदत करेल आणि आपण चांगल्या मानवत परिवर्तीत होऊ.

सार

एखाद्याने इतरांनी त्याच्याशी केलेले वाईट कृत्य आणि इतरांसाठी केलेले चांगले कृत्य विसरले पाहिजे. जेंव्हा एखादा सकारत्मक कार्य करण्यास घेतो, नकारात्मक वृत्ती गळून पडते. चांगल्या सवई वाईट सवईना पळवून लावतात.

एखाद्याने श्लोक जगला पाहिजे. जेव्हा आपण गीताच्या अगदी एका मूल्यांचा सराव करण्यास प्रारंभ करतो, हळू हळू इतर मूल्ये आपल्याकडे येतील. आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी एखाद्याने जाणीवपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे.

जसजसे एखादी व्यक्ती वाढते आणि अध्यात्माच्या मार्गावर येते तेव्हा त्याला हे जाणवते की वेदांताचा आनंद त्याच्या सरावात आहे. जेव्हा आपण इतर सुखांच्या मागे धावतो, तेव्हा ते आपल्याला अजून जास्तच प्राप्त करण्याच्या हव्यासात टाकतो परंतु वेदान्तामध्ये, जेव्हा आपण सराव शिकतो, ते खूप आनंददायक असल्याचे जाणवते जे परिपूर्ण आहे आणि एखाद्याला शांती प्रदान करते. नदीत डुबकी मारल्यावर, लोक आपल्या जुन्या जीवन प्रणालीत जावू इच्छित नाहीं; ते नवीन सुरू करण्यास तयार होतात. पाणी जरी केवळ शरीरास स्पर्श करते, आतील गुण ही बदलतात.

प्रामाणिकपणे परमेश्वराची उपासना करा. संपूर्ण विश्वास आणि आत्मसमर्पण केलेल्या लोकांना मृत्यू स्वीकृती घेवून येते. जे शहाणपणाने जगतात आणि जे शिकवणीचा सराव करतात, त्यांना मृत्यूची भीती वाटणार नाही.

विद्यार्थयांसाठी

नीती    : सत्य

उपनीती  : परिवर्तन

भगवद्गीता का वाचावी

एक म्हातारा शेतकरी आपल्या लहान नात्वाबरोबर डोंगरावर शेतामध्ये राहत होता. प्रत्येक सकाळी आजोबा लवकर उठत होते, स्वयंपाकघरात टेबलाजवळ बसून भगवद्गीता वाचत. त्याच्या नातवाला तसेच व्हायचे होते आणि त्याने त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केले.

एक दिवशी नात्वाने विचारले, “आजोबा! मी तुमच्या सारखे भगवद्गीता वाचायचे प्रयत्न करतो पण मला कळत नाहीं, आणि मला जे कळते ते मी पुस्तक बंद करताच विसरून जातो.  भगवद्गीता वाचल्याने काय भले होणार?”

चुलीत कोळसा घालायचे बंद करून आजोबानी उत्तर दिले, “ही कोळशाची टोपली घेऊन नदीवर जा आणि माझ्यासाठी टोपली भरून पाणी आन.” मुलाने जसे सांगितले तसे केले, परंतु घरी पोहोचे पर्यंत सर्व भरलेले पाणी गळून गेले.

आजोबा हस्त म्हणाले, “तुला पुढच्या खेपेला वेगाने चालावे लागेल,” आणि त्याला परत टोपली घेऊन नदीवर पाठवले. ह्यावेळेस मुलगा वेगाने पळाला, पण घरी पोहोचण्याच्या आधीच रिक्त झाले.

धापा टाकत त्याने आजोबाना सांगितले की अशा टोपलीत पाणी आणणे अशक्य आहे आणि तो त्याच्या ऐवजी बादली आणण्यासाठी गेला.

म्हातारा म्हणाला, “मला बादलीभर पाणी नको, मला टोपलीभर पाणी पाहिजे. तू कठीण प्रयत्न करत नाहींस,” आणि मुलाला पुन्हा प्रयत्न करण्यासाठी घर बाहेर जाताना तो पाहू लागला.

या टप्प्यावर, मुलाला हे माहित होते की हे अशक्य आहे, परंतु त्याला आपल्या आजोबांना दाखवायचे होते की जरी तो वेगाने पळत गेला, त्याने घरी पोहचे पर्यंत टोपली रिक्त होते. त्या मुलाने ती टोपली नदीत बुडविली आणि जोरात पळत सुटला, पण जेव्हा तो आजोबांकडे पोहोचला तेव्हा टोपली पुन्हा रिक्त झाली होती.

 

धापा टाकत तो म्हणाला, “आजोबा पहा, ते परिणामशून्य आहे!” “मग, तुला वाटते की ते परिणामशून्य आहे?” वृद्धांनी विचारले आणि त्याच्या नातवाला टोपली  बघायला सांगितले. मुलाने टोपलीकडे पाहिले आणि पहिल्यांदा टोपली वेगळी असल्याचे लक्षात आले. हे एका घाणेरड्या जुन्या कोळशाच्या टोपलीमधून रूपांतरित झाले होते आणि आता आतून बाहेरून स्वच्छ झाले होते.

“बाळा, आपण भगवद्गीता वाचल्याने असेच होते. तुला कळत नसेल किंवा सर्व आठवत ही नसेल, पण हे वाचताना, तू आतून बाहेरून बदलून जाशील. हेच कार्य आहे कृष्णांचे आपल्या जीवना वर.”

शिकवण

हे केवळ त्यात सामील असलेल्या थोर शिकवणींचे सामर्थ्य सिद्ध करते आणि हे सार्वभौम तत्त्वज्ञान जरी भिन्न प्रकारे व्यक्त केले गेले असले तरीही ते जगातल्या वेगवेगळ्या शास्त्रवाचनात सापडते. हे एक अत्यंत व्यावहारिक पुस्तक आहे आणि बर्‍याच प्रकारे हे सर्वात सुंदर पुस्तक आहे. हे आपल्याला समाजात कसे राहायचे   आणि आध्यात्मिक मुल्ये आपल्या जीवनाला प्रेरणादायक बनवण्यास कसे मदत करतात हे शिकवते. कारण भगवदगीता हेच अंतर्गत जीवनाचे महत्त्व शिकवते हेच विश्वातल्या सर्व जीवांचे प्रेरणा स्रोत बनते. अगदी लहान वयातच मानवी मूल्ये विकसित करणे महत्वाचे आहे जेणेकरून ते त्यांच्यात अंगभूत होते आणि ते त्या मूल्यांवर आधारित जीवन जगण्यास प्रारंभ करतात. मुलांना तरुण वयापासूनच  स्वतःवर विश्वास ठेवता आले पाहिजे आणि देवावर ही विश्वास ठेवला पाहिजे. अशा प्रकारे वाढलेल्या मुलांमध्ये अधिक लवचिक आणि आयुष्याचा सामना आंतरिक शक्ती आणि दृढनिश्चयाने करण्याची प्रवृत्ती निर्माण होते.