Archives

शहाणा माणूस आणि मुलगा

नीती : योग्य आचरण

उपनीती : तरुण वयात योग्य सवयी विकसित करा

एका श्रीमंत माणसाने एका शहाण्या माणसाला आपल्या मुलाच्या वाईट सवयी दूर करण्यासाठी सल्ला देण्याची विनंती केली. शहाण्या माणसाने बागेत फिरण्यासाठी तरुणाला आपल्या सोबत घेतले.

अचानक थांबून  त्याने मुलाला तिथे वाढणारी एक लहान रोप उपटायला सांगितले. मुलाने ते सहज उपटले. शहाण्या माणसाने त्याला नंतर थोडे मोठे रोप उपटायला सांगितले. मुलाने जोरात खेचले आणि ते रोप, मुळे आणि सर्व बाहेर आले. “आता ते उपट,” शहाण्या माणसाने एका झुडूपाकडे लक्ष वेधत सांगितले. ते खेचण्यासाठी मुलाला त्याची सर्व शक्ती पणाला लावावी लागली.“आता हे उपट,” शहाण्या माणसाने एका झाडाकडे दर्शवले.

मुलाने झाडाच्या खोडलापकडले आणि उपटायचे प्रयत्न करू लागला. पण ते काही हलेना. “हे अशक्य आहे,”

प्रयत्नाने धापा टाकू लागला.“वाईट सवयींचे असेच असते,” ऋषी म्हणाले. “त्यांनी लहान असताना हे काढता

येतात पण एकदा का ते जम पकडतात, त्यांना उपटणे सोपे नसते.”

या व्यावहारिक उदाहरणाद्वारे शहाण्या माणसाने मुलाच्या वाईट सवयी बदलल्या.

शिकवण :

एका कोवळ्या रोपाला सरळ करता येते, परंतु एका झाडाला सरळ करण्याचे जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा ते मोडते. योग्य मूल्ये लहान वयातच मनावर ठसवले गेले पाहिजेत आणि कोणतीही चुकीची कृती वेळेवरच अन्कुरातच टिपले पाहिजे. वेळेत एक टाका नऊ वाचवते. आधीच योग्य मूल्ये विकसित झालीत तर ती खोलवर रुततील आणि त्याचा सकारात्मक परिणाम होईल. त्याचप्रमाणे जेव्हा चुकीची किंवा वाईट सवयी लागतात तेव्हा जर योग्य वेळी त्याकडे लक्ष दिले नाही तर ते दूर करणे खूप कठीण होते.

कुजलेले केळी

नीती : योग्य आचरण


उपनीती : पुढे ढकलू नका

नरीमन हा देव माणूस होता. तो प्रार्थनेला बसायचा आणि देवाशी जुदायचा त्याच्या कडून शक्ती आणि प्रेरणा मिळवण्यासाठी. त्याने त्याची बरीचशी संपत्ती आणि वेळ गरिबांच्या सेवेसाठी घालविला. जेंव्हा मोफत वैद्यकीय शिबिर असायच्या, तेंव्हा तो इस्पितळात देखील बराच वेळ सेवा करायचा. तोफळे विकत घेऊन इस्पितलातल्या गरीब रुग्णांना वाटायचा. केंव्हा तरी कामगार वसाहतीतल्या मुलांना चित्रपटाला किंवा आईसक्रीम खायला घेवून जायचा. प्रत्येक सेवा ईश्वर प्रीत्यर्थ करायचा.

एक दिवशी त्याने आपल्या किशोर मुलामानितला सांगितले, “बाळा, मी आज देवळात चाललोय देवाला केली अर्पण करायला. नंतर मी
ही केली देवळाच्या बाहेर बसणाऱ्या भिकारीना वाटणार. तू माझ्या बरोबर का येत नाहींस?” मुलगा आळशीपणे म्हणाला, “अरे! जाऊ द्या बाबा! हे देऊळात जाऊन प्रार्थना करणे; ही सेवा क्रियाकलाप… ही माझ्या आवडीची नाहीं. तुम्ही वयस्कर आहात बाबा. हे सगळे तुमच्यासाठी आहे. मी तरुण आहे. मला स्वारस्य नाहीं. जेंव्हा मी तुमच्या सारखा वयस्कर होईन, तेंव्हा कदाचित मी त्याच्या बाबत विचार करीन, पण या क्षणी ….नाहीं!

मुलाने आपल्या वॉकमन पुन्हा समायोजित केले आणि रॅप-संगीताच्या तालावर त्याचे कूल्हे फिरवले. नरिमनने आपल्या मुलाचे म्हणणे ऐकले पण त्याला प्रत्युत्तर दिले नाही. तो बाहेर गेला आणि दिवसाचे वितरणाचे काम पूर्ण केले.

काही दिवसा नंतर, नरीमनने एक मोठी टोकरी भरून अति पिकलेली केळी विकत घेतली आणि त्यांना आपल्या घर बाहेर ठेवले. तो आंघोळीला गेला. त्याच्या मुलाने ती काळपट केळ्यांची टोकरी पाहिली आणि त्याला त्याच्यावर कीटक फिरताना दिसले. काही केळीतर कुजलेली ही होती आणि कुरूप होती. वडील एक पांढरा शुभ्र कुर्ता पाजामा घालून बाहेर आले आणि ती केली गाडीत ठेवू लागले. मुलाने विचारले, “बाबा, तुम्ही ही केली कुठे नेताय ?” “देवळात” वडलांनी उत्तर दिले, सर्वात नम्रपणे. “पण बाबा, ही केळी कुजलेली आहेत. मला म्हणायचे आहे की जर तुम्चाला ही देवाला अर्पण करायची असतील तर, तुम्ही निदान ताजी केली घ्यायला हवी होती. ती सगळीच लिबलिबीत आणि दळदार आहेत. त्यांना किडीचा प्रादुर्भाव देखील झाला आहे. ते मंदिरात अर्पण करणे लज्जास्पद होईल.”

वडील म्हणाले, “तू जर देवाच्या सेवेस अर्पण होण्यासाठी म्हातारपणाची वाट पाहू शकतोस; तुला जर वाटत असेल की तू म्हातारा झाल्यावर देवाच्या काही कामास येऊ शकशील किंवा देवा पुढे हजर होऊ शकशील, मग नक्कीच ही अति पिकलेली, आणि कुजलेली केळी देवाला अर्पण होऊ शक्तील.” मुलगा स्तब्ध झाला. तो वडलांच्या नजरेला नजर भिडवू शकत नव्हता. वडलांना समजले की या वालीस आपल बोलणे वर्मी लागले होते. ते म्हणाले, “जेंव्हा तू तरून आणि सशक्त आहेस, देवाच्या कार्यात तुझा हातभार लागू शकतो. तू क्रीयाकालप करू शकतो. तू काही वेळ आणि पैसा गरजू लोकांच्या सत्कार्यात लावू शकतो. जेंव्हा म्हातारपण येते, तुझ्या शरीराला त्याचेच काही त्रास होऊ शकतात. तू क्रीयाकालाप करण्यासाठी अयोग्य होऊ शकतो. तुला काही आर्थिक कष्ट येऊ शकतात, कारण तू कमावत नसणार आणि तुझे खर्चही वाढलेले असतील. तू
प्रार्थनेसाठी बसू शकणार नाहींस; कोणजाणे, तुला संधिवात किंवा सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. मग तू तेंव्हा काय अर्पण करू शकणार त्यावेळी तुलाच देवाच्या, इतर वेळे पेक्षा जास्तीच, कृपेची गरज लागणार.”

हे बोलून, वडलांनी शेवटचा कुजलेल्या केळीचा घड गाडीत ठेवला आणि गाडी चालवून निघून गेले. त्यांने आपला मुद्दा मांडला होता. तुम्ही जाणता तो कुठे गेला? तो देवळात नव्हता गेला, कारण त्याला ठाऊक होते की ही केळी देवाला अर्पण करण्या योग्य नव्हती. त्याऐवजी तो गौशाळेत गेला जिथे भटक्या गायीना ठेवतात आणि त्यांना ही केळी खाऊ घातली. कुजलेल्या केळयांनी आपले काम केले होते!


शिकवण :
जेव्हा एखादी व्यक्ती इतरांना मदत करण्याच्या स्थितीत असेल तेव्हा ती करणे आवश्यक आहे. हे उपयुक्त ठरेल आणि इतरांना त्याचा फायदा ही होईल. एखाद्याने योग्य वेळी गोष्टी करण्यास शिकले पाहिजे जेणेकरुन हे कार्य अर्थपूर्ण होईल. आपण उशीर करता कामानये आणि काही काळ नंतर करण्यासाठी पुढे ढकलणे उचित नाहीं.

काळजी करणारा मुलगा

नीती     : योग्य आचरण

उपनीती   : आदर, प्रेम

                

एक मुलगा त्याच्या वृद्ध आईला एका उपहारगृहात संध्याकाळी जेवायला घेऊन गेला. आई खूप वृद्ध आणि कमकुवत असल्या कारणाने, खाताना, तिच्या शर्ट आणि पयघोलावर अन्न सांडले. इतर जेवण करणार्यांना तिला पाहून किळस वाटायचा परंतु तिचा मुलगा शांत होता.

तिचे खावून झाल्यावर, तिचा मुलगा, ज्याला मुळीच लज्जास्पद वाटत नव्हते, चुपचाप तिला स्वच्छतागृहात घेऊन जायचा, अन्नाचे कण स्वच्छ करायचा, डाग काढायचा, केस विन्च्रायचा आणि तिचा चष्मा नीट लावायचा. जेंव्हा ते बाहेर यायचे, पूर्ण उपहारग्रह मरण शांतीत त्यांना बघायचे, अशा प्रकारे सार्वजनिकरित्या स्वत:ला लाजवावे हे कसे समजण्यास सक्षम होऊ शकत होते.

मुलाने बिल दिले आणि आईला ना घीता तिथून चालू लागला.

त्याचवेळी, उपहार्ग्राहातल्या जेवणारा एक वृद्ध माणूस त्या मुलाला हाक मारू लागला आणि विचारू लागला, “तू इथे काहीतरी सोडून गेला आहेस असे वाटत नाहीं का तुला?”

   

          

मुला नी उत्तर दिले, “नाहीं साहेब, मी नाहीं”

वृद्ध म्हातारा ने प्रत्युत्तर दिले, “होय, तू आहेस! तू प्रत्येक मुलाला आणि प्रत्येक आईला एक धडा देवून गेला आहेस.

उपहारग्रह शांत झाले.

शिकवण :

आपण वृद्ध झाल्यावर आपल्या पालकांना विसरू नये. त्यांचे वय आणि त्यांचे स्वभाव आणि वागणूक याबद्दल आपण लज्जित होऊ नये. आपल्या आईप्रमाणे कोणीही निःस्वार्थ प्रेम करु शकत नाही. त्यांनी आमच्यासाठी जे केले त्याबद्दल नेहमी कृतज्ञता बाळगा. त्यांना प्रेम आणि आदर द्या.

स्वतः लादलेल्या मर्यादा

मूल्य: योग्य दृष्टीकोन, सत्य

उप मूल्य: आत्मविश्वास,

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, बम्बळ मधमाशीचे शरीर खूप बोजड असून पंख खूपच लहान असतात. हवेच्या दाबामुळे मधमाशी उडू शकत नाही. परंतु तिला त्याची माहिती नसल्याने ती उडत रहाते.

जेव्हा तुम्हाला तुमच्या मर्यादा माहित नसतात तेंव्हा तुम्ही बाहेर जाऊन स्वत:ला चकित करता. मर्यादाबाबत तरतूद होती कां याचे आश्चर्य वाटते.

प्रत्येकावर असलेल्या मर्यादा या स्वत: लादलेल्या असतात. शिक्षणा मुळे तुम्ही स्वतःवर मर्यादा घालून घेऊ नका.

शिकवण

आपल्या मध्ये असलेल्या क्षमतेबाबत आपण सकारात्मक असले पाहिजे. आपण सकारात्मक दृष्टीकोनातून अडचणीविना पुढे जात राहून काम पूर्णत्वास नेण्याच्या आत्मविश्वासाने यशस्वीरित्या बाहेर पडले पाहिजे

खर्या मोत्यांचा हार

खर्या मोत्यांचा हार

नीती  : सत्य

उपनीती : आतील शक्तीची वास्तविकता जाणून घेणे, मौल्यवान वस्तूंचे कौतुक  

                जेनी एक तेजस्वी डोळ्यांची,  सुंदर पाच वर्षांची मुलगी होती. एक दिवस जेव्हा ती आणि तिची आई किराणामालाच्या दुकानात सामानाची खरेदी करीत होते,  तेव्हा जेनीने प्लास्टिकचा मोतीचा हार पाहिला होता ज्याची किमत अडीच डॉलर होती. तिला तो हार खूप आवडला  होता, आणि जेंव्हा तिणे तिच्या आयीला ते विकत घेण्यास विचारले, तिची आई म्हणाली, “हा हार सुंदर आहे, पण त्याची किमत खूप आहे. मी तुला काय सांगते. मी तुझ्यासाठी तो हार विकत घेते, आणि आपण घरी गेल्यावर ह्या हाराच्या किमतीच्या मोबदल्यात, मी तू करू शकशील अश्या कामांची एक यादी बनवते. आणि तुझ्या वाढदिवसाला तुझी आजी सुद्धा तुला काही डॉलर देईल, तेही विसरू नकोस. बर का?” जेनीने मान्य केले, आणि तिच्या आईने तो मोत्यांचा हार तिच्यासाठी विकत जेनीने घेतला.

दररोज, जेनीने तिला दिलेली कामे परिश्रमाने केली, आणि खरोखरच, तिच्या आजीने सुद्धा तिला नवीन कोरा डॉलर तिच्या वाढदिवशी दिला. लवकरच, मोत्यांच्या हाराची किमत फेडली होती.  जेनीला मोती खूप आवडायचे. ती ते प्रत्येक ठिकाणी जाताना घालायची – बालवाडीत, झोपताना आणि जेंव्हा जेंव्हा तिच्या आईने दिलेली काम करण्यासाठी जाताना.  आंघोळीसाठी जाताना मात्र ती ते घालत नसे; तिच्या आईने तिला सांगितले होते की तसे केल्यास तिचा गळा हिरवा होईल.

 जेनीचे वडील खूप प्रेमळ होते. जेनी जेंव्हा झोपायला जायची, ते त्यांच्या आवडत्या खुर्चीवरून उठून दररात्री जेनीला तिच्या आवडत्या गोष्टी वाचून सांगायचे. एका रात्री जेंव्हा त्यांची गोष्ट संपली, त्यांनी तिला म्हटले, “जेनी, तू माझ्यावर प्रेम करतेस काय?” “अरे हो, बाबा, तुला महींत आहे मी तुझ्यावर प्रेम करते ते,” त्या छोट्या मुलीने म्हटले.“बर, तर, मला तुझे मोती दे.”“अरे! बाबां, माझे मोती नाहीं!” जेनी म्हणाली. “पण तू माझी आवडती बाहुली, रोझी घेऊ शकतोस. ती आठवते? मला तू ती गेल्यावर्षी माझ्या वाढदिवशी दिली होती. आणि तू तिचे टी-पार्टी चा ड्रेस सुद्धा घेऊ शकतोस. ठीक आहे?” “अरे नको, बाळा, ते ठीक आहे.” तिच्या वडलांनी तिच्या गालाचा पापा घेतला. “शुभरात्री, चाकुली.”

एक आठवड्यानंतर, तिच्या वडलांनी गोष्ट सांगून झाल्यानंतर जेनीला पुन्हा विचारले, “तू माझ्यावर प्रेम करतेस काय?” “अरे हो, बाबा, तुला ठाऊक आहे मी तुझ्यावर प्रेम करते.”“बर तर, मला तुझे मोती दे.”“अरे बाबा, माझे मोती नाहीं! पण तू माझ्या खेल्नित्ला घोडा, रिबन्स, घेऊ शकतोस. तुला आठवते ती? ती माझी आवडती आहे. तिचे केस किती मऊ आहेत, आणि तू त्यांच्याशी खेळू शकतोस आणि वेणी बनवू शकतोस आणि काहीही. तुला पाहिजे असल्यास तू रिबन्स घेऊ शकतोस, बाबा,” त्या छोट्या मुलीने तिच्या वडलाना म्हटले. “नको, ठीक आहे,” तिचे वडील म्हणाले आणि पुन्हा तिच्या गालाचा पापा घेतला. “तुला देवाचा आशीर्वाद असो, चाकुले. शुभरात्री.”

 बर्याच दिवसानंतर, जेंव्हा जेनीचे वडील तिला गोष्ट  वाचून द्यायला आले, जेनी बेडवर बसली होती आणि तिचे होठ थरथरत होते. “घे बाबा,” ती म्हणाली, आणि तिणे हाथ पुढे केला. तिणे  ते उघडले आणि तिच आवडत मोत्याचा हार त्यात होता. तिणे  आपल्या वडलांच्या हातात सरकवले. एका हाताने तिच्या वडलांनी तो प्लास्टिकच्या मोत्यांचा हार घेतला आणि दुसऱ्या हाताने त्यांच्या खिश्यातून एक निळा मखमलीचा बॉक्स काढला. त्या बॉक्स मध्ये खरे, अस्सल, सुंदर मोती होते. ते त्यांचा बरोबरच होते. ते जेनीनी ती स्वस्तातली वस्तू सोडून द्यावी म्हणजे त्यांना ते खरी वस्तू देता येईल, ह्याची वाटच पाहत होते.

 शिकवण:

आपल्या आयुष्यात बर्याचवेळा  आपल्याला खर्या वस्तूची  जाणीव नसते आणि बिनमहत्वाच्या वस्तूंना जोपासतो. आम्ही आमच्या कम्फर्ट झोन मध्ये असतो  आणि मर्यादित विचार ठेवतो. जीवन आपल्यास आणखी चांगल्या गोष्टी देऊ शकते. आपण किती पेलू शकतो? आपल्याला आयुष्यात मोठे हेतूने किंवा कारणास्तव लहान गोष्टी सोडण्यास शिकणे आवश्यक आहे. आपल्यासाठी अधिक महत्व काय आहे आणि सत्य काय आहे हे पाहणे आवश्यक आहे. आपण सामर्थ्य, सांत्वन, आनंद इत्यादीच्या शोधात असतो तेव्हा जेव्हा आपल्या आत असतो. चला आपण आत बघू या.  

घर बांधणे

house

नीती : योग्य वर्तणूक

उपनीती : योग्य मनोवृत्ती

एक वयस्कर सुतार निवृत्त होण्यास आला होता. त्याने आपल्या नियोक्ता-ठेकेदारांना घरांच्या बांधकाम व्यवसायातून बाहेर पडून आपली पत्नीसह अधिक अंतःप्रेरणात्मक जीवन जगण्यासाठी आणि त्याच्या विस्तारित कुटुंबाचा आनंद घेण्यासाठी आपल्या नियोजनानुसार सांगितले. प्रत्येक आठवड्यात त्याला वेतनाचा  चेक मिळणार नव्हता,  पण त्याला निवृत्त व्हायच होत.

कंत्राटदाराला त्याचे एक चांगला कार्यकरता जाणार्याच दुख वाटत होत पण एक  वैयक्तिक उपकार म्हणून फक्त आणखी एक घर बांधण्याची विनंती केली. सुताराने होय म्हटले, परंतु कालांतराने हे दिसून आले की त्याचे मन त्याच्या कामात नाही. त्यांनी कमकुवत कारागिरीचा अवलंब केला आणि कनिष्ठ सामग्री वापरली. एक समर्पित करिअर संपविण्याचा एक दुर्दैवी मार्ग होता.जेव्हा सुताराचे काम संपले तेव्हा त्याचे मालक घराची पाहणी करण्यासाठी आले. मग त्याने सुतारला मुख्य दरवाजाच्या किल्ल्या दिल्या आणि म्हणाला, “हे तुमचे घर आहे … ही तुला माझी भेट आहे.”त्या सुतार्याला धक्का बसला!किती लाजिरवाणी गोष्ट! जर त्याला केवळ स्वतःच स्वतःच्या घराची बांधणी करत असल्याच माहीत असतं तर ते सर्व काही वेगळ्या प्रकारे केले असते.

शिकवण

आपण आपल्या आयुष्याची निर्मिती, एकावेळी एक दिवस, ह्या प्रमाणे करत  असतो, अनेकदा इमारतीतील आपल्या सर्वोत्तम क्षमतेपेक्षा कमी टाकत असतो. मग, आम्हाला जाणवत की आपण बांधलेल्या घरात आपल्यालाच राहावे लागते, ह्याचा धक्का बसतो. जर आपण हे करू शकलो तर आपण ते वेगळ्या पद्धतीने करू.पण आपण परत वळू शकत नाही. आपण सुतार आहोत,  आणि दररोज आपण एक खिळा ठोकतो, एक बोर्ड ठेवतो किंवा भिंत बांधतो. आपला दृष्टीकोन,  आणि आज आपण जे निवडतो तेच आपल्याला “घर” बांधण्यास मदत करते, जिथे आपण उद्या जगू.त्यामुळे, चला आपण सुज्ञपणे बांधूया! आपल्या प्रत्येक कार्यात, प्रत्येक क्षणी आपण आपले सर्वोत्तम योगदान करूया.    

Nagaratna Bhat

http://saibalsanskaar.wordpress.com

एक चांगला शिक्षक

 

नीती : योग्य वर्तणूक

उपनीती : कर्तव्य

आधीच तीन शाळेतून बाहेर काढला गेलेला एक विद्यार्थी, नव्यानेच शाळेत आला होता. एक शिक्षक वर्गात आले आणि त्या नवीन विद्यार्थ्याला पाहून विचार करू लागले: “न जाणो कुठ्न अशी लोक येतात…..”

दुसरे शिक्षक आले, नव्या विद्यार्थ्याला पाहिले, रागात आणि म्हणाले : “तुमच्या सारख्यांची कमतरता नाहीं……”

तिसरे शिक्षक वर्गात आले. “आपल्या वर्गात एक नवीन विद्यार्थी आला आहे काय?” त्याला आनंद झाला.

ते त्या नवीन विद्यार्थ्या कडे गेले, त्याचे हस्तांदोलन केले, त्याच्या डोळ्यात पाहिले, स्मित हास्य करीत म्हणाले: “सुप्रभात ! मी तुझीच वाट पाहत होतो!”

शिकवण :

खरा शिक्षक प्रेरणा आणि प्रेरणा देणारा असावा. शिक्षक मुलांना योग्य मार्गाने प्रोत्साहित करतो आणि मार्गदर्शन देतो. शिक्षक एखाद्या विद्यार्थ्याच्या जीवनात फार महत्वाची भूमिका बजावतात. एका प्रेरणा देणाऱ्या शिक्षकाचा संपूर्ण आयुष्यभर आदर केला जातो आणि लक्षात ठेवला जातो.  

Nagaratna Bhat

http://saibalsanskaar.wordpress.com

 

 

स्मित

smile 01

नीती    : योग्य आचार/प्रेम

उपनीती  : स्मित, काळजी घेणे 

अरबच्या सुलतानाला मुल्ला नसरुद्दिन खूप भावला होता आणि तो त्याला अनेकदा प्रवासात स्वतः बरोबर न्यायचा. एकदा, प्रवासात, शाही तांडा, वाळवंटातील एका अवर्णनीय गावात पोचला.

एक लहर वर,  सुल्तान मुल्लाला म्हणाला, “मला आश्चर्य वाटते की लोक मला या लहान ठिकाणी ओळखतील का. आपण इथे हा लवाजमा  थांबवून शहरात  पायी जावूया आणि नंतर ते मला ओळखू शकतील का ते पाहू.

 त्यानुसार, ते खाली उतरले आणि त्या धुळीच्या शहरातल्या रस्त्यावरून जावू लागले. अनेकांना नसरुद्दिनच्या दिशेने पाहून स्मितहास्य दिलेले पाहून सुलतान चकीत झाला, आणि त्याच्या कडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.               

काहीसे रागावून आणि चीद्चीडे होवून त्याने म्हटले, “इथले लोक तुला ओळखतात पण मला मुळीच ओळखत नाहींत.” 

“महाराज, ते मलाही ओळखत नाहींत,” मुलाने निष्पापपणे म्हटले.

मग ते फक्त तुमच्या कडेच पाहून हसायचे का?” सुलतानने विचारले. 

“कारण मी त्यांच्या कडे पाहून हसायचो.” नसरुद्दिन हसत म्हणाला. 

शिकवण: 

ही छोटी सुंदर गोष्ट दर्शवते की कसे निरागस स्मितहास्य शब्दातला साज आणि वजनापेक्षा जास्तच काही बोलून जाते. अनेकदा आपल्याला बुध्धीम्त्तेवर, किंवा इतरांना प्रभावित करण्यावर, किंवा वाद घालण्यावर खूप विश्वास असतो, पण जेंव्हा आपण मूलभूत रीतीने पाच मानवी मूल्यांवर बोलतो, उद. ‘कृती मध्ये प्रेम’ तेंव्हा बर्याचदा आपल्याला समोरच्या लोकांकडून प्रतिसाद मिळतो आणि प्रेमात चमत्कार घडतो. काहीवेळा आमच्या आत दडलेली गुप्त शक्ती एका स्मिताने प्रफुल्लीत होते. 

Nagaratna Bhatt

http://saibalsanskaar.wordpress.com

 

 

 

काठींचे बंडल

 

नीती    : योग्य आचार

उपनीती  : ऐक्य

एका विशिष्ट पित्याचे परिवारात पुत्र होते,  जे एकमेकांबरोबर भांडणे करत होते. काही केल्यास त्यांना समजवायचं कठीण होते, म्हणून त्यांनी एक असा प्रसंग घडवायचा ठरविला ज्यातून त्यांना भांडणामुळे होणार्या हानीची शिकवण घडवता येईल.

 

एके दिवशी जेंव्हा त्याचं भांडण विकोपाला गेले होते, त्यांनी त्यांना एक कठीणच बंडल आणावयास सांगितले. हे बंडल एक एक करून प्रत्येक मुलाच्या हातात दिले आणि ते बंडल तोडण्यास सांगितले. प्रत्येक मुलाने खूप प्रयत्न केले परंतु त्यांना अपयश आले.

त्या पित्याने मग हे बंडल उघडले आणि त्या काठ्या मुलांना दिले आणि तोडण्यास  सांगितले. हे त्यांना सहजरीत्या करता आले.

“माज्या मुलानो,” पिता म्हणाले, “तुम्हाला कळत नाहीं का, जर तुम्ही एकमेकांशी जुळवून घेतले आणि एकमेकांची  मदत केली तर, तुमच्या शत्रूला तुमचा काहीच वाईट करता येणार नाहीं? पण जर तुम्ही एकमेकांशी जुळवून ना घेता भांडत राहिलात तर तुम्ही ही एक एक काठी सारखे दुर्बळ व्हाल.”

 

शिकवण:

एकता ताकद आहे. एकटे असताना जे प्राप्त करू शकत नाहींत, ते एक संघ म्हणून आपण, जास्त प्राप्त करू शकतो.

Nagatrana Bhat

http://saibalsanskaar.wordpress.com

 

 

  स्टार फिशची गोष्ट

 

नीती    : योग्य आचार

उपनीती  : फरक घडवणे

एके काळी, एक ज्ञानी माणूस समुद्रकिनारी, आपल लिखाण करण्यासाठी जायचा. त्याला त्याच्या कामासाठी बसण्या आधी समुद्रकिनाऱ्यावर चालायची सवई होती.

एक दिवशी, समुद्रकिनाऱ्यावर चालत असताना, त्यांनी किनारपट्टीवर नजर घातली आणि त्याला एका माणसाच्या आकृतीच कोण तरी नाचत असल्याचे दिसले. कुणीतरी नाचत असल्याची क्ल्पना करूनच त्याला हसू येत होते, आणि म्हणूनच तो लगबगीने त्या दिशेने चालू लागला. जवळ पोचताक्षणी, त्याला ती आकृती एका तरुण मुलाची असल्याची जाणवली, आणि तो जे काय करत होता ते नृत्य नव्हतेच. तो तरुण किनारपट्टीवर धावून येत होता, छोटी वस्तू उचलत होता आणि पुन्हा त्यांना समुद्रात फेकत होता.

हा माणूस अजून त्याच्या जवळ आला आणि त्याला हाक मारून बोलू लागला ‘सुप्रभात! तू काय करतोस, मी हे जाणू शकतो?’

तो  तरुण काहीसा थांबला, वर पाहिले आणि म्हणाला “स्टारफिशला समुद्रात फेकतो.”‘तर मी तुला विचारतो, की तू स्टारफिशला समुद्रात का फेक्तोस?’ त्या काहीसा चकीत झालेल्या माणसाने विचारले.

ह्याला तो तरुण म्हणाला, “सूर्य वर येतोय आणि समुद्रात ओहोटी येत आहे. मी जर त्यांना फेकल नाहीं तर ते मरून जातील.” 

हे ऐकल्यावर त्या शहाण्या माणसाने म्हटले, ‘पण, तरुण माणसा, तुला जाणवत नाहीं काय ही किनारपट्टी खूप लांब आहे आणि प्रत्येक मीलात कित्तीतरी स्टारफिश आहेत? तू कदाचित फरक करू शकणार नाही!’ 

येथे, तरुण पुन्हा वाकला, अजून एक स्टारफिश उचलला, आणि समुद्रात फेकला. पाण्याचा स्पर्श होताच, तो म्हणाला, ‘त्याला फरक पडला.’ 

शिकवण :

संधी मिळताक्षणी आपणही फरक घडवूया. एक स्मितहास्य किंवा एक मृदू शब्द देखील कोणाचाही दिवस चांगला बनवू शकतो. थोडासा प्रयत्न नेहमीच चांगला असतो
Nagaratna Bhatt

http://saibalsanskaar.wordpress.com