काठींचे बंडल

 

नीती    : योग्य आचार

उपनीती  : ऐक्य

एका विशिष्ट पित्याचे परिवारात पुत्र होते,  जे एकमेकांबरोबर भांडणे करत होते. काही केल्यास त्यांना समजवायचं कठीण होते, म्हणून त्यांनी एक असा प्रसंग घडवायचा ठरविला ज्यातून त्यांना भांडणामुळे होणार्या हानीची शिकवण घडवता येईल.

 

एके दिवशी जेंव्हा त्याचं भांडण विकोपाला गेले होते, त्यांनी त्यांना एक कठीणच बंडल आणावयास सांगितले. हे बंडल एक एक करून प्रत्येक मुलाच्या हातात दिले आणि ते बंडल तोडण्यास सांगितले. प्रत्येक मुलाने खूप प्रयत्न केले परंतु त्यांना अपयश आले.

त्या पित्याने मग हे बंडल उघडले आणि त्या काठ्या मुलांना दिले आणि तोडण्यास  सांगितले. हे त्यांना सहजरीत्या करता आले.

“माज्या मुलानो,” पिता म्हणाले, “तुम्हाला कळत नाहीं का, जर तुम्ही एकमेकांशी जुळवून घेतले आणि एकमेकांची  मदत केली तर, तुमच्या शत्रूला तुमचा काहीच वाईट करता येणार नाहीं? पण जर तुम्ही एकमेकांशी जुळवून ना घेता भांडत राहिलात तर तुम्ही ही एक एक काठी सारखे दुर्बळ व्हाल.”

 

शिकवण:

एकता ताकद आहे. एकटे असताना जे प्राप्त करू शकत नाहींत, ते एक संघ म्हणून आपण, जास्त प्राप्त करू शकतो.

Nagatrana Bhat

http://saibalsanskaar.wordpress.com

 

 

Leave a comment