Tag Archive | कृतज्ञता

श्रीमंत माणूस मनःशांतीच्या शोधात

नीती   : शांती

उपनीती : कृतज्ञता, देवाशी कृतज्ञता

एक अति श्रीमंत माणूस, जीवनातील सर्व सुख उपभोगून, पैशांनी विकत घेवू शकणारे सर्व वस्तूंचा उपभोग घेवूनही समाधानी नव्हता. त्याला अजून कुठल्यातरी  अधीप्रमाणित वस्तूची भूक होती. तो सर्व साधू व संताशी चौकशी करायचा, आणि त्याने त्यांनी सांगितलेली सगळीच कर्मकांड, पूजा अर्चा, प्रार्थना केलीत, पण कशाचाही उपयोग झाला नाहीं.

शेवटी हा माणूस दुसर्या संताकडे  गेला आणि आपल्या दुखाच्या बद्दल सांगून सतत व वारंवार त्याचा छळ करू लागला – “वेळ व्यतीत होत चालला आहे, आणि तुम्ही कसले संत आहात? तुम्हाला मला योग्य मार्ग दाखवता येत नाहीं. आणि मला त्यासाठी  अर्पण करण्यास चोवीस तास आहेत; मला पैसे कमविण्यासाठी किंवा कोणत्याही गोष्टीसाठी काम करण्याची गरज नाही, मला मुले नाहींत, आणि मी इतका पैसा कमवला आहे की तो किमान दहा जीवनासाठी पुरेसे आहे.” संताने त्याला थोडेसे वेडे असलेले सूफी मास्टरकडे पाठविले, ज्यांच्याकडे अनेक ऋषी आपल्या शिष्यांना त्यांच्यापासून मुक्त करण्याचा प्रयत्न करीत पाठवत असत. पण ते वेडे दिसणारे सुफी संताकडे भव्य शहाणपणा होता.                     

श्रीमंत माणसाने एक मोठा बॅग घेवून त्यात हिरे, माणके,  नीलम आणि नीलमणी भरले; आणि तो झाडाखाली बसलेल्या त्या सुफीकडे गेला. त्याने सुफिला त्याची संपूर्ण कथा सांगितली….. तो किती दुःखी आहे, त्याच्याकडे  सर्वकाही जगाला परवडण्यासारखे होते. “मी तुम्हाला पुरावा देण्यासाठी ही लाखांची संपूर्ण बॅग आणली आहे. मला केवळ मनः शांती हवीय.” सुफी म्हणाला, “मी ते तुला देईन. सज्ज हो.”श्रीमंत माणसांनी विचार केला, “हा विचित्र माणूस वाटतोय. मी इतक्या संतांकडे गेलोय – कोणीही इतक्या सहजतेने, इतके शीघ्र देण्याच वचन दिले नाहीं. सर्वांनी म्हटले, ‘हे कर्मकांड कर, ही उपासना कर, ही प्रार्थना म्हण, हे ध्यान कर. स्वतः कष्ट कर.’ हा एकमेवच आहे…..कदाचित, ते सर्वजण खरेच सांगतात की हा वेडा आहे. हा म्हणतोय, ‘सज्ज हो. वेळ दवडू नकोस!’

 घुटमळत तो म्हणाला, “ठीक आहे, मी तयार आहे.” जरी तो मनः शांती मिळवण्याकरीता आला होता, तो खूप घाबरलेला होता. आणि जेंव्हा त्या माणसाने म्हटले की तो तयार आहे, त्या सुफी मास्तराने ती पिशवी ओढून घेतली आणि तो पळाला.

 ते गाव छोटे होते ज्यात छोट्या गल्ल्या होत्या ज्याची त्या सुफीला चांगलीच माहिती होती. तो श्रीमंत माणूस कधीच पाळलेला नव्हता. तो त्या सुफीच्या मागे ओरडत पळू लागला, “माझी फसवणूक झालीय! हा माणूस संत नव्हे. हा वेडाही नाहीं, हा कावेबाज आहे.” पण त्याला त्या सुफीला पकडता आले नाहीं कारण तो इतका वेगाने जात होता आणि गावात इतक्या वळण घेत होता की त्याला पकडणे अशक्य  होते.  तो वृध्द माणूस जाडा होता – धापा टाकीत, घाम गाळीत, तो रडत होता – आणि सर्व जण त्याला पाहून हसत होते. सगळे त्याला पाहून का हसत होते हे त्याला कळत नव्हते, आणि कोणीही त्याची मदत करत नव्हते. पण गावातल्या लोकांना ठाऊक होते की तो सुफी वेडा नव्हता त्याच्या उलट तो कावेबाज होता. तो त्याच्या स्वत:च्या पद्धतीने काम करत होता. 

आखेर, तो श्रीमंत माणूस त्याच वृक्षा जवळ पोचला. तो सुफी त्याच्या तो आधीच तिथे पोचला होता; तो ती पिशवी घेऊन तिथे बसला होता. आणि, श्रीमंत माणूस ओरडत होता, शिवी घालीत होता. सुफी म्हणाला, “हा सर्व मूर्खपणा थांबव! ही बॅग घेऊन जा.”

 त्याने लगेच बॅग ताब्यात घेतली, आणि सुफीने विचारले, “कसे वाटतेय?” तो म्हणाला, “मला खूप शांती वाटतेय.” सुफी म्हणाला, “तेच तर मी तुला सांगत होतो. तू तयार असशील तर मी तुला लगेच शांती देऊ शकतो. तुला ते मिळाले का?” तो म्हणाला, “मला ते मिळाले.” 

“पुन्हा कोणालाही त्याच्या विषयी विचारू नकोस! तू तुझी सर्व संपत्ती गृहीत धरली आहेस. मी तुला ती  गमाविण्याची एक संधी दिली आणि अचानक तू तेच झाला जो तू आहेस – भिकारी. आणि हेच मौल्यवान दगड तुझ्यासाठी मौल्यवान  ठरले आहेत.” पण तसेच घडते. 

शिकवण:

महालात राहणारे त्याच महालाला गृहीत धरतात; श्रीमंत लोक गरिबांच दुख समजून घेत नाहींत. ज्या लोकांकडे मास्तर आहेत त्यांनी त्यालाच गृहीत धरले – की काही उरले नाहीं; तुम्ही केवळ प्रश्न विचारायचा आणि तुमचे मास्तर आहेत तुम्हाला उत्तर द्यायला. तुमच्या आयुष्यात मिळालेल्या वस्तूची आणि भेटवस्तूंची कदर करायला व जोपासायला शिका.          

Nagaratna Bhatt

http://saibalsanskaar.wordpress.com

वस्तूंपेक्षा माणसाना महत्व द्यावे!!!

4165.writeyoursorrows_lrg_0

 

नीती – चांगली वर्तणूक

उपनीती – कृतज्ञता / क्षमा 

 दोन मित्र अजय व विराज जंगलातून चालत होते. अचानक अजयने विराजला थोबाडीत मारली. तेव्हा विराजला लागले पण काही न बोलता त्याने लगेच वाळूत लिहिले “आज मला अजयने थोबाडीत मारली”

 थोड्या अंतरावर एक नदी होती. त्यात त्या दोन मित्रांनी आघोळीसाठी उडी मारली. विराज बुडू लागला, तेव्हा अजयने त्याला वाचवले. नदीतून बाहेर आल्यावर विराजने लगेच एका दगडावर लिहिले “आज अजयने मला वाचवले.”

अजयला आश्चर्य वाटले. त्याने विराजला विचारले ” कायरे, मी जेव्हा तुला मारले तेव्हा तू वाळूत लिहिलेस, आणि जेव्हा वाचवले त्या वेळेस तू दगडावर कोरलेस. असे का बरे?”

विराज ने उत्तर दिले, ” आपल्याला कोणी दुखवले, तर आपण ते वाळूत लिहावे, म्हणजे क्षमेची लाट येते व ते पुसून टाकते. पण कोणी आपल्याला मदत केली तर दगडावर कोरावे, जिथे कोणतीही लाट पुसू शकत नाही.”

शिकवण :

खरे आहे मित्रानो, आपली सवय कशी आहे पहा !! वाईट गोष्टी आपण लक्षात ठेवतो, पण चांगली गोष्ट आपण लगेच विसरतो. चल तर या नवीन वर्षी आपण आपल्या सवयी थोड्या बदलूया. आज पासून आपण सर्वांनी फक्त चांगल्या गोष्टी लिहून ठेवू. आपल्याकडे काय वस्तू आहेत हे बघण्यापेक्षा आपल्या आयुष्यात किती चांगली लोक आहेत ह्या कडे लक्ष देवूया. करून तर पहा………किती आनंद व सुख आहे त्याचात!!!!!!

 

सानिका / वृषाली